महाराष्ट्र

maharashtra

केईएम रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचा 'असहकार', विविध मागण्यांसाठी आंदोलनाचा पवित्रा

By

Published : May 19, 2020, 3:20 PM IST

केईएम रुग्णालयात कोरोना कोव्हिड-१९ चा कक्ष तयार करण्यात आला असून याठिकाणी काम करणाऱ्या रोजंदारीवरील तसेच बहुउद्देशीय कामगारांच्या विविध मागण्यांसंदर्भात केईएम अधिष्ठात्यांशी पत्रव्यवहार करूनही त्यांनी दखल न घेतल्याने येत्या बुधवारी त्यांनी असहकार पुकारुन आंदोलनाचा इशारा दिला आहे.

केईएम रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या मागणीसाठी उद्या असहकार आंदोलन
केईएम रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या मागणीसाठी उद्या असहकार आंदोलन

मुंबई - कोरोना विषाणूच्या रुग्णांवर उपचार करणाऱ्या केईएम रुग्णालयातील रोजंदारीवरील तसेच बहुउद्देशीय कामगारांच्या विविध मागण्यांसंदर्भात दुर्लक्ष केले जात असल्याची माहिती आहे. त्यामुळे, आपल्या मागण्यांकरता बुधवारी २० मे ला असहकार आंदोलन करण्याचा इशारा 'दि म्युनिसिपल मजदूर युनियन'चे सरचिटणीस रमाकांत बने यांनी दिला आहे.

केईएम रुग्णालयातील रोजंदारी आणि बहुउद्देशीय कामगारांना मासिक वेतन वेळेत देण्यात यावे. दररोज ३०० रुपयांचा जोखीम भत्ता देण्यात यावा. कोव्हिड कक्षात काम करणाऱ्या कामगारांची राहण्याची व्यवस्था करण्यात यावी. तसेच सर्व कामगार, कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात यावी, आदी मागण्यांसाठी केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख यांना निवेदन दिले आहे. मात्र, तरीही कामगारांच्या मागण्यांकडे रुग्णालय प्रशासन दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे कामगारांमध्ये कमालीचा असंतोष पसरला असल्याचे बने यांनी सांगितले.

पालिकेच्या चतुर्थ श्रेणी कामगारांना जोखीम भत्यांचे वाटप करण्यात आले आहे. मात्र, कंत्राटी, रोजंदारी आणि बहुउद्देशीय कामगारांना ही रक्कम दिली जात नाही. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असताना पालिका कामगारांप्रमाणेच कंत्राटी, रोजंदारी आणि बहुउद्देशीय कामगार आपल्या जीवाची पर्वा न करता काम करत आहेत. त्यानंतरही पालिका आणि रुग्णालय प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने 'दि म्युनिसिपल मजदूर युनियन'च्या नेतृत्वाखाली बुधवारी असहकार आंदोलन पुकारले जाणार आहे. तसेच, यामुळे वैद्यकीय सेवा कोलमडून पडल्यास त्याला प्रशासन जबाबदार असेल, असा इशारा युनियनचे सरचिटणीस रमाकांत बने यांनी दिला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details