मुंबई - कोरोना काळात मुंबईकरांसाठी दिलेल्या विशेष योगदानाबद्दल मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना "वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड लंडन "ने सन्मानित करण्यात आले. "वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड लंडन"चे अध्यक्ष संतोष शुक्ला यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र अध्यक्षा फराह सुलतान अहमद यांनी महापौर किशोरी पेडणेकर यांना ट्रॉफी व प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित केले.
महापौरांच्या कामाची घेतली "वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड लंडन"ने दखल - The mayor's work was noted by the "World Book of Records London
शिवसेनेच्या नगरसेविका असलेल्या किशोरी पेडणेकर यांची महापौर पदावर नियुक्ती झाल्यावर काही काळातच कोरोनाचा प्रसार सुरू झाला. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी महापौर पीपीई किट घालत रुग्णांना चांगले उपचार मिळतात का? याचा आढावा घेत होत्या. रुग्णांना आणि नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून महापौर अनेक ठिकाणी भेटी देत आढावा घेत आहेत. या कामा दरम्यान महापौरांना कोरोनाची लागण झाली. कोरोनामुक्त होताच त्या पुन्हा कामाला लागल्या आहेत.
महापौर वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड लंडनने सन्मानित
कार्याची दखल घेऊन सन्मान
महापौरांचे काम