मुंबई - कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी वापरण्यात येणाऱ्या रेमडेसिवीर इंजेक्शनचा राज्यातच नव्हे तर देशात मोठा तुटवडा आहे. राज्याला दररोज अंदाजे 60 लाख इंजेक्शनची गरज असताना आजही केवळ दिवसाला 36 ते 37 हजार इंजेक्शन उपलब्ध होत आहेत. केंद्र सरकारने 21 एप्रिल ते 9 मे दरम्यान राज्याला 8 लाख 9 हजार इंजेक्शनचा साठा दिला आहे. त्यानुसार आतापर्यंत यातील 3 लाख 85 हजार 401 इंजेक्शन मिळाले आहेत. तर अजून अंदाजे 3 लाख 25 हजार इंजेक्शनची प्रतीक्षा आहे. हा साठा पुढील सहा दिवसांत मिळायला हवा अशी माहिती अन्न आणि औषध प्रशासनातील (एफडीए) एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे. एकूणच 19 दिवसांच्या हिशोबाने राज्याला दिवसाला 36 ते 37 हजार इंजेक्शन उपलब्ध होत आहेत. त्यामुळे आजही किमान 20 हजार इंजेक्शन अपुरे पडत आहेत.
...तरीही डॉक्टरांकडून इंजेक्शनचा वापर
कोरोनावर अजूनपर्यंत औषध मिळालेले नाही. असे असताना गंभीर रुग्णांसाठी वर्षभरापासून इतर आजारावरील रेमडेसिवीर इंजेक्शन वापरले जात आहे. याचा फायदा गंभीर रुग्णांना होत असल्याचे डॉक्टर म्हणतात. पण, वैद्यकीय संस्था, आयसीएमआर आणि तज्ज्ञांनी मात्र हे इंजेक्शन फायद्याचे नाही. यामुळे रुग्णांचा जीव वाचत नाही. तेव्हा विनाकारण हे इंजेक्शन वापरू नका, नातेवाईकांचे हाल इंजेक्शन मिळवण्यासाठी करू नका, असे सांगितले आहे. त्यातही आता ही सर्व परिस्थिती लक्षात घेता आणि इंजेक्शनचा तुटवडा पाहता इंजेक्शन विचारणासाठी महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. तो म्हणजे आता मुंबईत पालिकेला आणि इतर जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांना ठराविक साठा दिवसाला दिला जात आहे. तर रुग्णालयाच्या मागणीनुसार उपलब्ध साठा जिल्हाधिकाऱ्यांकडून रुग्णालयाना वितरित केला जात आहे. आता या इंजेक्शनची आधी प्रमाणे वितरक किंवा होलसेलर, मेडिकल विक्रेते यांच्याकडून विक्री होत नाही. असे असताना ही अनेक डॉक्टर इंजेक्शन लिहून देत ते आणून देण्यासाठी नातेवाईकांचा पिच्छा पुरवत असल्याचे चित्र आहे. अशा अनेक तक्रारी समोर येत आहेत. इंजेक्शनसाठी आजही नातेवाईक वणवण करत आहेत. तेव्हा डॉक्टरांनी मुळात इंजेक्शन खूपच गरज असले तरच वापरावे, असे आवाहन पुन्हा एकदा केले आहे.
थोडासा दिलासा