महाराष्ट्र

maharashtra

Mumbai Railway Jewelery Bag : 17 लाखांची दागिन्यांची बॅग काही तासांत केली परत

By

Published : Feb 21, 2022, 1:20 PM IST

Updated : Feb 21, 2022, 1:28 PM IST

मुंबई - चेन्नई एक्सप्रेसमधून प्रवास करणाऱ्या एका महिला प्रवाशाची 17 लाखांचे दागिने असणारी बॅग ट्रेनमध्ये हरवली ( Missing 17 Lakh Jewelry Bag ) होती. ती बॅग सीएसएमटी लोहमार्ग पोलिसांनी अवघ्या काही तासात शोधून काढली आहे. या बॅगेत सुमारे 17 लाखांचे दागिने होते. ही बॅग आता पोलिसांनी तक्रारदार महिलेला आहे सुपुर्द केली आहे.

CSMT railway
CSMT railway

मुंबई : मुंबई - चेन्नई एक्सप्रेसमधून प्रवास करणाऱ्या एका महिला प्रवाशाची बॅग हरवली ( Lost jewelery bag on Mumbai-Chennai Express ) हाेती. ज्या बॅगेत सुमारे 17 लाखांचे दागिने हाेते. या प्रकरणी सीएसएमटी लोहमार्ग पोलिसांनी तात्काळ कारवाई करत, अवघ्या काही तासात ही बॅग शोधून काढली. त्यानंतर पोलिसांनी दागिन्यांची बॅग त्या महिलेला सामानासह सुपुर्द केली.

अशी घडली घटना -

48 वर्षीय नागम्मा शिवलींगी अप्पा आन्नपल्ली ही महिला प्रवासी आपल्या कुटूंबियासोबत मुंबईत येण्याकरिता, गुरुवारी तेलंगणाच्या कृष्णा रेल्वे स्थानकावरून चेन्नई एक्सप्प्रेस गाडीतून प्रवास सुरू केला होता. या प्रवासादरम्यान त्यांनी त्यांचेजवळील सामान सिटचे खाली ठेवले होते. दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी सकाळी 5 वाजून 30 मिनिटांनी चेन्नई एक्स्प्रेस दादर रेल्वे स्टेशन फलाट क्र. 06 वर पोहचली. त्यानंतर त्यांनी गाडीतून खाली उतरून फलाटावर उभे राहून बॅगा मोजल्या असता, त्यांची ग्रे रंगाची बॅग ही गाडीत सिटखाली विसरली असल्याचे त्यांचे लक्षात आले. त्यांनी लागेच पाठीमागील लोकल गाडी पकडून सीएसएमटी रेल्वे स्टेशन ( CSMT railway station ) येथे आल्या. त्यांनी फलाट क्रमाक 09 वर उभ्या असलेल्या अप चेन्नई एक्सप्रेस गाडीचे कोच नं. एस/4 मध्ये जावून आपल्या बॅगेचा शोध घेतला. परंतु ती बॅग डब्यात मिळाली नाही. त्यावेळी खात्री झाली की, त्यांची सिटखाली विसरलेली बॅग चोरीला गेली आहे. त्यानंतर त्यांनी याबाबतची तक्रार छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे पोलीस ठाण्यात दिली.

ईश्वरने अवघ्या काही तासात शोधली बॅग -

सीएसएमटी रेल्वे पोलीस ठाणेकडील गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलीस अंमलदार, तसेच सीएसएमटी मेनलाईन रेल्वे स्टेशन येथे कर्तव्यावर पोलीस कॉन्स्टेबल ईश्वर सुखदेव जाधव होते. त्यांनी अप चेन्नई एक्सप्रेसची माहिती घेतली. त्यावेळी ती ट्रेन माझगांव यार्ड येथे वॉशिंगकरीता गेलेली असल्याची माहिती प्राप्त झाली. त्यानुसार जाधव यांनी लागलीच कार्यतत्परता दाखवत माझगांव यार्ड येथे गेले. तेथे अप चेन्नई एक्सप्रेस उभी होती परंतू तिचे दारे खिडक्या बंद होत्या. तेव्हा त्यांनी युक्तीन गाडीचे आपत्कालीन खिडकीतून आत प्रवेश करून एस/4 डब्यामध्ये जावून बॅगेचा शोध घेण्यास सुरुवात केली. त्यावेळी बॅग सिटखाली एका कोपऱ्यात पडलेली ( Bag was found under the seat ) त्यांना आढळून आली.

बॅगेत 16 लाख 85 हजार रुपयांचे दागिने होते -

त्यानंतर लोहमार्ग पोलिसांनी तक्रारदार यांना बोलावून सापडलेली बॅग दाखविली. ती बॅग तक्रारदार महिलेनी तपासली आणि आपलीच असल्याचे सांगितले. त्यानंतर बॅगेतील दागिने तपासले असता, त्यामध्ये गळयातील 5 सोन्याचे हार, 3 मंगळसुत्र, सोन्याची चेन, 7 सोन्याचे वाळे, सोन्याचे ब्रेसलेट, 5 सोन्याच्या अंगठ्या, 6 जोड सोन्याची कर्णफुले असे एकूण 326 ग्रॅम वजनाचे आणि 16 लाख 85 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने जसंच्या तसे मिळून आलेले आहेत. त्यानंतर दागिन्यांसह बॅग त्या महिला प्रवासीला देण्यात ( Returned bag with jewelry ) आली. अशी माहिती सीएसएमटी लोहमार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मेहबूब इमानदार यांनी दिली आहे.

Last Updated : Feb 21, 2022, 1:28 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details