मुंबई- विधान परिषदेवर राज्यसरकारकडून पाठवण्यात आलेली 12 नामनियुक्त सदस्यांची यादी सचिवालयात उपलब्ध नसल्याची धक्कादायक माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांना राज्यपाल सचिवालयाने दिली होती. मात्र आता ही यादी राजभवनातच आल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे.
12 नामनियुक्त सदस्यांची यादी राजभावनातचं
राजभवनात 12 नामनियुक्त सदस्यांची यादी उपलब्ध नसल्याची माहिती राज्यपाल सचिवालयाकडून मिळाल्या नंतर या बाबत महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून टीका सुरू झाली होती. 12 नामनियुक्त सदस्यांची यादी भुताने पळवली का? असा सवाल खासदार संजय राऊत यांनी विचारला होता.
नियुक्तीबाबत निर्णय झाला होता
राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये विधान परिषदेच्या 12 सदस्यांची नियुक्तीबाबत निर्णय झाला होता अशी माहिती दिली. यासाठी रीतसर प्रस्ताव राज्यपालांना देण्यात आला. पण राज्यपालांकडून अशा प्रकारचे उत्तर येणे हे अनपेक्षित आहे. ही बाब हास्यास्पद असल्याचे देखील बाळासाहेब थोरात यांनी म्हटले होतं. अशा प्रकारचे उत्तर देणे चुकीचे असून, त्यामुळे राज्यपालांनी समोर येऊन खुलासा करणे गरजेचे असल्याचं यांनी सांगितले. याबाबतीत राजकारण दिसत नसलं तरी, या पद्धतीचे वागणे चुकीचे असल्याचं बाळासाहेब थोरात म्हणाले होते. या 12 नामनियुक्त सदस्यांची यादी महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी राजभवनात जाऊन राज्यपालांच्या सुपूर्द केली होती.
हेही वाचा-मास्क न घालणाऱ्या मुंबईकरांकडून आतापर्यंत ५५ कोटी ५६ लाखांच्या दंडाची वसुली