महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

The largest housing project : सोलापुरात साकारतोय देशातील सर्वात मोठा गृहप्रकल्प, पंतप्रधानांच्या हस्ते होणार वितरण - 30 हजार दुर्बल घटकातील लाभार्थींना घरे

The largest housing project : सोलापुरात देशातील सर्वात मोठा गृहप्रकल्प साकारला जात आहे. पंतप्रधानांच्या हस्ते त्याचं वितरण होणार आहे. देशातील सर्वात मोठा शासकीय गृह प्रकल्प राज्यातील सोलापूर जिल्ह्यात साकारतो आहे. सुमारे 30 हजार घरांच्या या प्रकल्पाचं काम वेगात सुरू असून त्याच्या पहिल्या टप्प्यातील घरांचं वितरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लवकरच करण्यात येणार असल्याची माहिती गृहनिर्माण विभागाचे उपसचिव अजित कवडे यांनी दिली.

The largest housing project
The largest housing project

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 25, 2023, 5:25 PM IST

Updated : Oct 25, 2023, 9:10 PM IST

मुंबई The largest housing project :प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत राज्यात सर्वात मोठा असलेला गृहप्रकल्प सध्या सोलापूर जिल्ह्यातील कुंभारी येथे आकारास येतो आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यातील रे नगर येथे हा प्रकल्प सुरू असून या प्रकल्पाद्वारे सुमारे 30 हजार दुर्बल घटकातील लाभार्थींना घरे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. याबाबतची कार्यवाही वेगाने सुरू असून पहिल्या टप्प्यातील घरे पूर्णत्वास येत आहेत. पहिल्या टप्प्यातील घरांसाठी आवश्यक असणाऱ्या पायाभूत सुविधा निर्माण करण्याचं वेगवान काम सुरू आहे. पाणी रस्ते वीज आणि मलनिस्सारण या सुविधा या पहिल्या टप्प्यातील घरांसाठी लवकरच उपलब्ध करून देण्यात येणार आहेत, अशी माहिती गृहनिर्माण विभागाचे उपसचिव अजित कवडे यांनी दिली आहे.


काय आहे प्रकल्प - प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकाकरता 30000 घरकुलांचा रे नगर येथे ३५० एकर परिसरात प्रकल्प उभारण्यास केंद्रीय मान्यता आणि सनियंत्रण समितीने 2016 मध्ये मान्यता दिली आहे. या महत्वाकांक्षी प्रकल्पाचं भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जानेवारी 2019 मध्ये करण्यात आलं आहे. रे नगर येथे सुरू असलेल्या या प्रकल्पामध्ये तळमजला आणि दोन मजले अशी प्रत्येक इमारतीत असणार आहे. एकूण 833 इमारती उभ्या केल्या जात आहेत. या ८३३ इमारतींच्या माध्यमातून सुमारे 30 हजार घरकुलांची निर्मिती होत आहे. या प्रकल्पासाठी एकूण खर्च १८११.३३ कोटी रुपये इतका असून त्यापैकी राज्य शासनाने आपला हिस्सा 300 कोटी रुपये आणि केंद्र शासनाने आपला हिस्सा 450 कोटी रुपये देण्याचं मान्य केलं आहे. केंद्र शासनानं सदर प्रकल्पासाठी मंजूर केलेल्या निधी अंतर्गत आतापर्यंत 261 पूर्णांक १४४ कोटी रुपये आणि राज्य शासनानं 202 पूर्णांक 44 कोटी असा एकूण 463.584 कोटी इतका निधी वितरित केला आहे. सदर प्रकल्प हा दोन टप्प्यात पूर्ण करण्यात येणार असून यापैकी पहिल्या टप्प्याचे काम पूर्णत्वास आलं आहे असं गृहनिर्माण विभागानं स्पष्ट केलं.

कोण असतील लाभार्थी - देशातील सर्वात मोठा असलेला हा पंतप्रधान आवास योजनेअंतर्गतचा गृहप्रकल्प आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाकरता आहे या प्रकल्पांतर्गत असंघटित क्षेत्रातील विणकर कामगार, वाहक, बिडी कामगार, यंत्रमाग कामगार, घरगुती कामगार, मोटार गॅरेज कामगार, दुकानांमध्ये काम करणारे कामगार, फळ आणि फुलं विक्रेते, घड्याळ तसंच चष्मे दुरुस्ती करणारे कारागीर यासारख्या छोट्या व्यावसायिक लाभार्थींकरिता ही घरे उपलब्ध करून देण्यात येत आहेत.



पंतप्रधानांच्या हस्ते होणार वितरण -या गृहप्रकल्पातील पहिल्या टप्प्यातील हजारो घरांची निर्मिती झाली असून या घरांचं वितरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संबंधित कामगारांना करण्यात येणार आहे. त्यासाठी पंतप्रधानांची वेळ मागितली असून लवकरच हा वितरण सोहळा होईल, असंही गृह विभागाने सांगितलं.

हेही वाचा...

Atul Save On OBC House : ओबीसींसाठी आनंदाची बातमी; दहा लाख घरे मिळणार बांधून, गृहनिर्माण मंत्री सावे यांची माहिती

Last Updated : Oct 25, 2023, 9:10 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details