मुंबई - मुंबईत 5 ऑगस्ट रोजी पडलेल्या मुसळधार पावसात मलबार हिल येथील टेकडीचे भूस्खलन झाले होते. त्यात रस्ता आणि पुलाचे नुकसान झाले होते. पालिकेने या ठिकाणी दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. त्याची पाहणी आज (दि. 13 ऑक्टोबर) अतिरिक्त महापालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलारसू, पोलीस अप्पर आयुक्त (वाहतूक) पडवळ यांनी केली. यावेळी केम्प्स कॉर्नर उड्डाणपूल येत्या 15 ऑक्टोबरपासून सुरू करण्याचे निर्देश संबंधिताना दिले आहेत. त्यामुळे 15 ऑक्टोबरपासून हा पूल वाहतुकीसाठी खुला होणार आहे.
केम्प्स कॉर्नर उड्डाणपूल 15 ऑक्टोबरपासून होणार वाहतुकीसाठी खुला - मलबार हिल बातमी
मुंबईत 5 ऑगस्टला मलबार हिल येथील टेकडीचे भूस्खलन झाले होते. याची पाहणी करून केम्प्स कॉर्नर उड्डाणपूल येत्या 15 ऑक्टोबरपासून सुरू करण्याचे निर्देश अतिरिक्त महापालिका आयुक्त, पोलीस अप्पर आयुक्त यांनी संबंधिताना दिले आहेत.
5 ऑगस्टला न्यायमूर्ती सीताराम पाटकर मार्ग येथील मार्गाच्या बाजूला ‘मलबार हिल’ परिसरातील टेकडीचे भूस्खलन झाले. त्यानंतर, महापालिकेने सदर भूस्खलन झालेल्या भागाची पुनर्बांधणी करण्याचे काम तातडीने हाती घेतले. या कामासाठी आयआयटी, मुंबई यांच्या अध्यक्षतेखाली तांत्रिक तज्ज्ञ समिती देखील नेमण्यात आली. या अनुषंगाने सदर रस्त्याची, पुलाची व तेथे सुरू असलेल्या कामांची संयुक्त पाहणी अतिरिक्त महापालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलारसू, पोलीस अप्पर आयुक्त (वाहतूक) पडवळ, महापालिका उपायुक्त (पायाभूत सुविधा) संजय दराडे यांनी आज केली. दरम्यान, संबंधित तज्ज्ञांशी, अभियंत्यांशी चर्चा करुन वाहतूकीच्या दृष्टीने केम्प्स कॉर्नर उड्डाणपुल येत्या 15 ऑक्टोबरपासून सुरू करण्याचे निर्देश संबंधिताना दिले आहेत. तसेच यासाठी सदर उड्डाणूपलाचे आवश्यक ते दुरुस्तीकरण करुन व उड्डाणपुलावरील रस्त्याचे तातडीने नुतनीकरण करुन सदर उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला करण्यात येत आहे, अशी माहिती महापालिकेच्या पूल खात्याद्वारे देण्यात आली आहे.
या कामासाठी नेमण्यात आलेल्या सल्लागार समितीमध्ये ख्यातनाम संरचनात्मक सल्लागारांसह भूगर्भशास्त्र तज्ज्ञांचाही समावेश आहे. या कामासाठी महापालिकेने एका तज्ज्ञ सल्लागार संस्थेचीही नेमणूक केली आहे. तांत्रिक तज्ज्ञ समितीने व तांत्रिक सल्लागार यांनी सादर केलेली संकल्प चित्रे व निविदा सूचना प्रकाशित झालेल्या आहेत. सदर निविदा प्रक्रियेअंती डिसेंबर 2020 मध्ये ‘मलबार हिल’ परिसरातील सदर टेकडीची पुनर्बांधणी व भूस्खलानामुळे प्रभावित झालेल्या न्यायमूर्ती सीतारात पाटकर रस्त्याची पुनर्बांधणी ही कामे सुरु होणार आहे.
हेही वाचा -केंद्राच्या शेतकरी कायद्यांविरोधात गुरुवारी काँग्रेसची शेतकरी बचाव रॅली!