महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Heavy Rain Warning : राज्यात पुढील 4 दिवसात गारपिटीसह मुसळधार पावसाचा इशारा - मुसळधार पावसाचा इशारा

भारतीय हवामान खात्याने पुढील चार दिवस राज्यात गारपिटीसह मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे हवामान विभागाने राज्याच्या विविध भागात सतर्कतेचा इशारा दिला आहे.

Heavy Rain Warning
Heavy Rain Warning

By

Published : Mar 15, 2023, 4:49 PM IST

मुंबई : राज्यातील शेतकरी शेतीमालाला हमीभाव नसल्याने संकटात सापडला आहे. मात्र, आता दुसऱ्या बाजूला या बळीराजावर अस्मानी संकट येऊन ठेपल आहे. भारतीय हवामान विभागाने पुढील चार दिवस राज्यात गारपिटीसह मुसळधार पावसाचा इशारा दिला असून, राज्यातील विविध भागात अलर्ट जारी करण्यात आला आहे. एका बाजूला शेतात वर्षभर राबुन उभं केलेले पीक काढणीला आलेलं असतानाच, आता पुढील चार दिवस पावसाचा अंदाज असल्याने शेतकरी संकटात सापडला आहे.

तापमानात 2 अंशांची घट :दरम्यान भारतीय हवामान विभागाच्या मुंबई विभागातून मिळालेल्या माहितीनुसार, सध्या हवामानात प्रचंड वेगाने बदल होत आहेत. जेव्हा एका ठिकाणी कडकडीत ऊन पडलेलं असतं त्याचवेळी डोंगराळ भागात ढगाळ वातावरण असल्याचं सध्या पाहायला मिळतेय. पुढील चार दिवसात दिवसभराच्या कमाल तापमानात दोन अंश सेल्सिअस पर्यंत घट होण्याची देखील शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी काढणीला आलेल्या पिकाची काळजी घेऊन पुढील चार दिवस अलर्ट राहावे असं आवाहन राज्याच्या हवामान विभागाकडून करण्यात आलं आहे.

कुठं पाऊस कुठं ऊन :यासंदर्भात अधिक माहिती अशी की, 16 मार्च गुरुवारपासून ते 18 मार्च पर्यंत राज्यातील काही भागात. वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. पाऊस पडण्याची दाट शक्यता मुंबई आणि कोकण विभाग वगळता विदर्भ आणि मराठवाडा विभागात अधिक आहे. त्यासोबतच मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात पावसाच्या हलक्या सरी कोसळून शकतात. त्यामुळे या विभागातील नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी पुढील चार दिवस आपल्या पिकाची योग्य ती काळजी घ्यावी.

या जिल्ह्यांत अलर्ट जारी :भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मराठवाड्यातील उस्मानाबाद, लातूर, हिंगोली, नांदेड तर विदर्भातील गोंदिया, भंडारा, गडचिरोली, यवतमाळ, चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये अलर्ट जारी करण्यात आला आहे. दुसरीकडे उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार, जळगाव, धुळे, नाशिक या जिल्ह्यांत वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे. पश्चिम महाराष्ट्रात पावसाची शक्यता अतिशय कमी असल्याने या भागाला येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. अशी माहिती भारतीय हवामान विभागाच्या मुंबई विभागातील अधिकाऱ्यांनी दिली आहे.

हेही वाचा - Minister Deepak Kesarkar : सरकार कुठल्याही परिस्थितीत खाजगीकरण करणार नाही - दीपक केसरकर

ABOUT THE AUTHOR

...view details