महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Bharat Jodo Yatra : ऐतिहासिक भारत जोडो यात्रेने द्वेषाला दूर करून देशाला प्रेमाने जोडले - नसीम खान - भारत जोडो यात्रेवर नसीम खान काय म्हणाले

भाजपाने आपल्या राजकीय फयद्यासाठी द्वेषाच्या माध्यमातून लोकांना विभाजीत करण्याचे काम केले. त्याविरोधात ‘नफरत छोडो, भारत जोडो’ असा नारा देत काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून देशाला पुन्हा एकदा प्रेमाने जोडले आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष माजी मंत्री नसीम खान यांनी केले आहे. तसेच, द्वेषाच्या या वातावरणामुळे देशाचे प्रचंड नुकसान झाल्याचा आरोपही खान यांनी केला आहे.

Bharat Jodo Yatra
Bharat Jodo Yatra

By

Published : Jan 30, 2023, 4:13 PM IST

मुंबई : महागाई, बेरोजगारी तसेच जीएसटीमुळे देशात निर्माण झालेली आर्थिक विषमता, सामाजिक ध्रुवीकरण, केंद्रीय संस्थांचा गैरवापर या मुद्द्यांवर राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली कन्याकुमारीहून निघालेली भारत जोडो यात्र ४ हजार किलोमीटरचा प्रवास करून काश्मीरच्या श्रीनगरमध्ये पोहोचली आहे. आज सोमवार (दि. 30 जानेवारी)रोजी श्रीनगर येथे ध्वजारोहण करून या यात्रेचा समारोप झाला आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना ते बोलत होते.

ध्वजारोहण : या यात्रेच्या समर्थनार्थ प्रदेश काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवन येथे नसीम खान यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तसेच, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस प्रमोद मोरे, मुनाफ हकीम, प्रवक्ते निझामुद्दीन राईन, भरत सिंह, नासीर हुसेन, राणी अग्रवाल, प्रदेश सचिव राजाराम देशमुख, विनय राणे यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. भारत जोडो यात्रेला महाराष्ट्रातही मोठ्या प्रमाणता प्रतिसाद मिळाला होता. त्यावर राहुल गंधी यांनीही स्वत: प्रतिक्रिया दिली होती.

ध्रुवीकरण करून देशाला विभाजीत केले : नसीम खान यांनी यावेळी भाजपच्या राजकारणावर सडकून टीका केली आहे. ते म्हणाले की, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी संपूर्ण विश्वाला सत्य, अहिंसा, शांतीच्या मार्ग दाखवला. त्यांनी दाखवलेल्या या मार्गावर चालूनच भारताने प्रगती केली आहे. हाच विकासाचा शाश्वत मार्ग असून गांधीजींच्या भारतात द्वेषाला जागा नाही. केंद्रातील नरेंद्र मोदी यांचे सरकार व भारतीय जनता पक्षाने आपल्या राजकीय फायद्यासाठी या देशात जाती धर्माच्या आधारावर ध्रुवीकरण करून देशाला विभाजीत करण्याचे काम केले आहे असा घणाघात त्यांनी यावेळी केला आहे.

राहुल गांधी यांनी जनतेला संबोधित केले : राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो यात्रेने केंद्रातील सत्ताधाऱ्यांनी देशात पसरवलेल्या द्वेषाला प्रेमाने उत्तर दिले आहे. या ऐतिहासीक यात्रेने संपूर्ण देशाला प्रेमाच्या धाग्याने जोडल्याचे खान यांनी सांगितले आहे. भाजपच्या हिंदुत्ववादी विचारसरणीवरही त्यांनी परखड टीका केली आहे. दरम्यान, आज या ऐतिहासीक भारत जोडो यात्रेचा काश्मिरमध्ये समारोप झाला आहे. दरम्यान, यावेळी फक्त काँग्रेसचेच नाही तर देशातील विरोधी पक्षाचे नेते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी राहुल गांधी यांनी जनतेला संबोधित केले.

हेही वाचा :जम्मू-काश्मीरमध्ये भारत जोडो यात्रेचा समारोप, द्वेषाच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी ही यात्रा काढल्याचे खरगेंचे उच्चार

ABOUT THE AUTHOR

...view details