महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

High Court: कर्तव्यात कसूर केल्याने जवान बडतर्फ, नोकरीवर पुन्हा घेण्याची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली - औद्योगिक सुरक्षा दल

कर्तव्यात कसूर केल्याने केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलामध्ये (Central Industrial Security Force) सेवेत असलेल्या जवानाला बडतर्फ करण्यात आले होते. दरम्यान, त्याची नोकरीवर पुन्हा घेण्याची याचिका उच्च न्यायालयाने (High Court dismissed the plea) फेटाळली.

High Court
कर्तव्यात कसूर केल्याने जवान बडतर्फ, नोकरीवर पुन्हा घेण्याची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली

By

Published : Nov 23, 2022, 11:01 PM IST

मुंबई:केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलामध्ये सेवेत असलेल्या जवानाला औष्णिक उर्जा केंद्रावर (Central Industrial Security Force) ड्युटीवर असताना झोपल्याच्या कारणावरून बडतर्फ करण्यात आले होते. जवानाने मुंबई उच्च न्यायालयात (High Court dismissed the plea) नोकरीवर पुन्हा घेण्याची याचिका दाखल केली होती. ही याचिका मुख्य न्यायमूर्ती दिपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती अभय अहुजा यांच्या खंडपीठाने फेटाळून लावली आहे.

प्रकरण काय?नागपुरमधील मौदा येथील औष्णिक उर्जा केंद्रावर कर्तव्य बजावताना संतोष रमेश कायतळेला कर्तव्यावर असताना वारंवार झोपत असल्याचे वरिष्ठांच्या निदर्शनास आले. त्याची दखल घेत अनुशासनहीनता आणि घोर निष्काळजीपणाबद्दल त्याला बडतर्फ करण्यात आले. त्या निर्णयाला संतोषने उच्च न्यायालयात आव्हान (lea for reinstatement) दिले होते. त्यावर मुख्य न्या. दीपांकर दत्ता आणि न्या. अभय अहुजा यांच्यासमोर सुनावणी पार पडली.


अर्जदार सार्वजनिकरित्या महत्त्वाचे असलेल्या मालमत्तेच्या संरक्षणाची जबाबदारी निभावणार्‍या शिस्तबद्ध सीआयएसएफ जवान (Central Industrial Security Force) असून रात्रपाळीला कर्तव्य बजावताना झोप घेणे हा निष्काळजीपणाच आहे. संतोषला यापूर्वी वरिष्ठ अधिकार्‍यांकडून अनेकदा ताकीद देण्यात आली होती. मात्र त्यानंतरही त्याची झोपण्याची सवय सोडली नाही. असे अधोरेखित करत खंडपीठाने बडतर्फीच्या कारवाईविरोधातील याचिका फेटाळली.

ABOUT THE AUTHOR

...view details