मुंबई - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू झालेल्या लॉकडाऊनमुळे ग्राहकांनी अनेक वस्तूंची खरेदी ऑनलाइन करायला पसंती दिली. मात्र, याला पुस्तक अपवाद ठरली आहेत. मुंबईतील नावाजलेल्या पुस्तक विक्रीच्या दुकानात आजही ग्राहक स्वतः जाऊन पुस्तक खरेदीला पसंती देत आहेत.
ऑनलाइन पद्धतीने 8 ते 10 इयत्तेच्या वर्गाच्या शाळा सुरू झाल्या आहेत. प्राथमिक, माध्यमिक व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी लॉकडाऊनमध्येही घरी अभ्यास सुरू केलाय. जसेजसे मिशन बिगेन अंतर्गत काही प्रमाणात शिथिलता देण्यात आली आहे, तसतशी दुकाने सुरू झाली. त्यामुळे पालकांनी आपल्या मुलांसाठी दुकानात जाऊन पाठ्यपुस्तक अभ्यासक्रमाच्या पुस्तकाच्या खरेदीला पसंती दिलीय. याबाबत दादरमधील प्रसिद्ध आयडियल बुक डेपोचे अनिकेत तेंडुलकर यांच्याकडे विचारणा केली असता, ऑनलाइन पुस्तकांमध्ये 30 ते 40 टक्के प्रिंटिंग खराब आढळून झाल्याच्या तक्रारी असतात, तर पावसात पुस्तक भिजलेली हाती येतात. त्यामुळे ऑफलाईन खरेदीसाठी पालक व विद्यार्थ्यांचा कल वाढला असल्याचे ते म्हणाले.