मुंबई-12 नामनियुक्त सदस्यांची यादी राज्यपाल सचिवालयात उपलब्ध नसल्याची धक्कादायक माहिती समोर आल्यानंतर याबाबत राज्यपालांनी समोर येऊन खुलासा करावा. याबाबतीत राजकारण दिसत नसलं तरी हे वागणं चुकीचं असल्याचं मत बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले आहे.
राज्यपालांनी 12 सदस्यांच्या यादीबाबत खुलासा करावा - list of 12 nominated members is not available in the Governor's Secretariat
12 नामनियुक्त सदस्यांची यादी राज्यपाल सचिवालयात उपलब्ध नसल्याची धक्कादायक माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांना राज्यपाल सचिवालयाने दिली.
राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरातयांची मागणी
विधान परिषदेवर राज्यसरकार कडून पाठवण्यात आलेली 12 नामनियुक्त सदस्यांची यादी राज्यपाल सचिवालयात उपलब्ध नसल्याची धक्कादायक माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांना राज्यपाल सचिवालयाने दिली. त्यामुळे याबाबत राज्यपालांनी स्वतः खुलासा करावा अशी मागणी राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. मंत्रिमंडळ बैठकीमध्ये विधान परिषदेच्या 12 सदस्यांची नियुक्तीबाबत निर्णय झाला होता. यासाठी रीतसर प्रस्ताव राज्यपालांना देण्यात आला. पण राज्यपालाकडून अशा प्रकारचे उत्तर येणे हे अनपेक्षित आहे. ही बाब हास्यास्पद असल्याचे देखील बाळासाहेब थोरात यांनी म्हणले आहे. अशा प्रकारचे उत्तर देणे चुकीचे असून, या बाबत जो कोणी दोषी असेल त्यावर कारवाई झाली पाहिजे, अशी देखील मागणी बाळासाहेब थोरात यांनी केली. त्यामुळे राज्यपाल सचिवालय कडून आलेल्या उत्तरानंतर जनतेच्या मनातही या यादीबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे राज्यपालांनी समोर येऊन खुलासा करणे गरजेचे असल्याचे बाळासाहेब थोरात यांनी सांगितले. याबाबतीत राजकारण दिसत नसलं तरी, या पद्धतीचे वागणे चुकीचे असल्याचं बाळासाहेब थोरात म्हणाले आहेत.
तौक्ते चक्रीवादळाची नुकसान भरपाई लवकरच
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, ऊर्जा मंत्री नितीन राऊत आणि मत्स्य बंदर विकास मंत्री असलम शेख यांनी नुकसानग्रस्त भागाचा पाहणी दौरा केलेला आहे. लवकरच पंचनामे पूर्ण होऊन मदतीची घोषणा केली जाईल, असे मत बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले. येणाऱ्या कॅबिनेट बैठकीमध्ये यासंबंधीचा निर्णय घेतला जाईल अशी शक्यता बाळासाहेब थोरात यांनी वर्तवली आहे.
हेही वाचा-मंत्रालयाच्या गेटवर काळा झेंडा बाधण्याचा होता प्रयत्न; मराठा आंदोलक पोलिसांच्या ताब्यात