मुंबई -औरंगाबादचे नाव बदलणे हा शिवसेनेचा जुना अजेंडा आहे. पण, महाआघाडीचे सरकार हे तीन पक्षांचे सरकार आहे. हे विसरता कामा नये. कॉमन मिनीमम प्रोग्राम अंतर्गत युती सरकारे चालतात. कोणाच्या वैयक्तिक अजेंड्यातून नाही. सरकार काम करण्यासाठी आहे, शहरांचे नाव बदलण्यासाठी नाही, अशी सनसनीत टीका काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी शिवसेनेवर केली आहे.
शिवसेनेने आपली भूमिका थोपवल्यास सरकारला धोका; संजय निरुपम यांचा इशारा
कॉमन मिनीमम प्रोग्राम अंतर्गत युती सरकारे चालतात. कोणाच्या वैयक्तिक अजेंड्यातून नाही. सरकार काम करण्यासाठी आहे, शहरांचे नाव बदलण्यासाठी नाही, अशी सनसनीत टीका काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी शिवसेनेवर केली आहे.
औरंगजेबनी केलेल्या कृत्यांना काँग्रेसचे समर्थन नाही. संभाजी महाराज एक वीर योद्धे होते. काँग्रेसने नेहमी त्यांचा सम्मान केला आहे. काँग्रेसने औरंगाबाद शहराचे नाव बदलण्याचा विरोध केला आहे. मात्र, हा विरोध संभाजी महाराजांचा अपमान करण्यासाठी करण्यात आलेला नाही. सरकार ही काम करण्यासाठी अस्तित्वात आहे. तिने शहरांची नावे बदलण्याएवजी इतर कामांकडे लक्ष देण्याची गरज आहे. त्यामुळे, हा विरोध असल्याचे स्पष्टीकरण संजय निरुपम यांनी दिले.
हेही वाचा -अन् पोलिसाने 'त्या' वृद्ध व्यक्तीला मरणाच्या दारातून बाहेर काढलं..पाहा व्हिडिओ..