मुंबई - एकीकडे सरकार कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याचा दावा करत आहे. मात्र, सध्या तरी सरकारकडे आवश्यक ते व्हेंटिलेटरच उपलब्ध नसल्याचे भाजप आमदार राम कदम यांनी सभागृहात सांगितले. यासंदर्भात 'ईटीव्ही भारत' सोबत बोलताना कदम यांनी सांगितले की, मुंबईत कोरोनाचे रुग्ण वाढत असताना विविध रुग्णालयात केवळ 13 व्हेंटिलेटर उपलब्ध आहेत. तसेच यासंदर्भात माहिती देताना त्यांनी मुंबईतल्या मोठ्या रुग्णालयामध्ये असलेल्या व्हेंटिलेटरची संख्याही सांगितली.
केईएम - 225, सायन - 126, नायर - 90, जेजे - 89, कांदिवली शताब्दी - 30, वांद्रे भाभा - 17 या सर्व रुग्णालयात सध्या व्हेंटिलेटर इतर रुग्णांना लावण्यात आले आहेत. केवळ 13 व्हेंटिलेटर सध्या उपलब्ध आहेत. जर मुंबई सारख्या शहरात कोरोना फोफावला तर सरकार व्हेंटिलेटर कसे उपलब्ध करणार आहे, असा सवाल ही त्यांनी केला.