मुंबई :युवा शक्तीच्या जोरावर अशक्य अशी उद्दिष्ट्यै साध्य करता येत आहेत जगभरातील अनेक देशांत तरुणांची संख्या कमी होत आहे तसेच लोकसंख्याही रोडावत आहे मात्र भारत एकमेव देश आहे जेथे सर्वात जास्त युवकांची संख्या आहे प्रगतीपथावर पुढे जात राहण्यासाठी भारतातील युवक कठोर परिश्रम करणारा आणि गुणवान असणे अत्यंत गरजेचे आहे तरुणांना आणखी सक्षम करण्यासाठी काय करता येईल याचा उहापोह जागतिक युवा दिनी व्हायला हवा भारतातील युवकांना योग्य दिशा दिल्यास नक्कीच भारताचा विकास वेगाने होईल
जागतिक युवा दिनाचा इतिहास१२ ऑगस्ट रोजी जगभरात जागतिक युवा दिन साजरा केला जातो संयुक्त राष्ट्राच्या आमसभेने १७ डिसेंबर १९९९ ला या संदर्भात निर्णय घेतला होता १२ ऑगस्ट २००० साली पहिल्यांदा युवा दिन साजरा करण्यात आला तर याआधी १९८५ हे वर्ष जागतिक युवा वर्ष म्हणूनही घोषित करण्यात आले होते
कसा साजरा केला जातो युवा दिनदरवर्षी संयुक्त राष्ट्राकडून युवा दिनाचा विषय ठरवला जातो या दिवशी युवकांशी संबंधीत विविध प्रकारचे कार्यक्रम जागतिक व्यासपीठावर आयोजित केले जातात परेड कॉन्सर्ट मेळावे प्रदर्शन तरुणांसाठी मार्गदर्शनपर कार्यक्रम व्याखाने चर्चा परिसंवाद आयोजित केले जातात या कार्यक्रमांतून तरुणांना संदेश दिला जातो टीव्ही रिडिओ या द्वारेही अनेक कार्यक्रमांचे प्रसारण केले जाते
तरुणांचा सहभाग वाढविण्याचा प्रयत्नस्थानिक आणि समुदाय स्तरावर तरुणांचा सहभाग वाढविणे राष्ट्रीय स्तरावर कायदे धोरणे आखताना आणि त्यांची अंमलबजावणी करताना तरुणांचा सहभाग जागतिक स्तरावर कसा वाढवता येईल या संदर्भाने या निमित्ताने विचार केला जात आहे. स्थानिक तसेच राष्ट्रीय स्तरावर प्रत्येक क्षेत्रात धोरण आखताना तरुणांचा सहभाग वाढवण्यावर भर दिला जात आहे
कोरोनाचा परिणामदेशभरात कोरोना लॉकडाऊनमध्ये सूट दिली असली तरी तरुणांच्या बेरोजगारीत वाढ होतच आहे सेंटर फॉर मॉनिटरिंग ऑफ इंडियन इकॉनॉमी या संस्थेनुसार १७ मे ला देशात २४ टक्के बरोजगारीचा दर होता. एप्रिल महिन्यात लॉकडाऊन असताना आणि मे महिन्यात लॉकडाऊन शिथिल केला असतानाही बेरोजगारीच्या दरावर कोणताही परिणाम झाला नाही मार्च २१ ला देशात ७.४ टक्के बरोजगारी दर होता तो ५ मे ला वाढून २५.५ टक्के झाला २० ते ३० वयोगटातील २ कोटी ७० लाख तरुणांची एप्रिल महिन्यात नोकरी गेली. लॉकडाऊनमुळे शहरी भागातील बेरोजगारी ३०.९ टक्के या दराने वाढेल असा अंदाज संस्थेने वर्तवला होता
युवकांसाठीच्या योजना प्रधान मंत्री कौशल्य विकास योजनाकेंद्र सरकारने २०१५ साली कौशल्य विकास योजना युवकांसाठी सुरु केली २०२० पर्यंत १ कोटी युवकांना कौशल्याधारीत बनवणे आणि कार्यक्षम करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे आत्तापर्यंत ७३ लाख ४७ हजार युवकांनी या योजनेअंतर्गत प्रशिक्षण घेतले आहे त्यातील १६ लाखांपेक्षा जास्त युवकांना रोजगारही मिळाला आहे १३७ विविध क्षेत्रातील कौशल्य तरुणांना देण्यात येत आहे