महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पहिली लस टोचवून घेणाऱ्या मुंबईतील कोरोना योद्ध्यांशी 'ईटीव्ही भारत'ची खास बातचीत - मुंबई कोरोना लस बातमी

आम्ही लसी टोचवून घेतल्या आहेत, तुम्हीही टोचवून घ्या आणि कोरोनाला हरवा, असे आवाहन मुंबईतील लस टोचवून घेणाऱ्या डॉक्टरांनी केले आहे.

लस टोचवून घेणारे डॉक्टर्स
लस टोचवून घेणारे डॉक्टर्स

By

Published : Jan 16, 2021, 3:19 PM IST

Updated : Jan 16, 2021, 4:43 PM IST

मुंबई- आम्ही लसी टोचवून घेतल्या आहेत, तुम्हीही टोचवून घ्या आणि कोरोनाला हरवा, असे आवाहन मुंबईतील पहिली लस टोचवून घेणाऱ्या डॉ. मधुरा पाटील व दुसरी लस टोचवून घेणाऱ्या डॉ. मनोज पसांगे यांनी केले आहे.

बातचित करताना प्रतिनिधी

बीकेसी कोविड सेंटरमध्ये मागील दहा महिन्यांपासून सेवा देणाऱ्या डॉ. मधुरा पाटील म्हणाल्या, आम्ही अनेक संकटांवर मात करत रुग्णांना उपचार दिले. आज महत्वाचा दिवस असून आज लस घेणारी मी पहिली कोरोना योद्धा असल्याचा अभिमान वाटत आहे. तर दुसरी लस घेणाऱ्या डॉ. मनोज पसांगे म्हणाले, लस घेऊन बराज वेळ झाला आहे. तरी मला काहीही त्रास झालेला नाही. तेव्हा लस सुरक्षित आहे, असे त्यांनी सांगितले. आम्ही लस घेतली आहे, पुढे सर्वांनी लस घ्या आणि कोरोनाला हरवा, असे आवाहन या दोघांनी केले.

Last Updated : Jan 16, 2021, 4:43 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details