मुंबई : राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या २७ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. शिंदे सरकारचा हा पहिला अर्थसंकल्प असणार आहे. अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारचा अर्थसंकल्प मांडणार आहेत. या पार्श्वभूमीवर मंत्री फडणवीस यांनी जिल्हा क्रीडा प्रशिक्षण केंद्रांसाठी भाजपचे पालकमंत्री असलेल्या ठिकाणी १ कोटी ५ लाख २ हजार रुपये तर शिवसेनेच्या पालकमंत्र्यांच्या जिल्ह्यांना केवळ ६८ लाख १५ हजार ५०० रुपये इतका निधी दिला आहे.
आमदारांची निधी वाटपात उपेक्षा : महाविकास आघाडी सरकार असताना, शिवसेनेने अर्थमंत्री अजित पवार यांनी निधी दिला नाही. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना भरघोस निधी देत, डावलत असल्याचा आरोप शिवसेनेचे आमदार करत होते. याच मुद्द्यावर आम्ही बाहेर पडलो असेही ते म्हणाले आहेत. त्यानंतर भाजप विशेषतः देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन केले. मात्र, शिंदे सरकारच्या काळातही शिवसेनेतील आमदारांची निधी वाटपात उपेक्षा होत आहे असही ते म्हणाले आहेत.
असा झालाय निधी वाटप :२०२२ - २३ या आर्थिक वर्षात राज्य शासनाने अर्थसंकल्पातील ४५०.०० लक्ष तरतूदीमधून २४ जिल्हा क्रीडा प्रशिक्षण केंद्रांसाठी १ कोटी ७३ लाख १७ हजार ५०० रुपये इतका निधी वितरित करण्यास मान्यता दिली आहे. शिंदे फडणवीस सरकारमध्ये २० मंत्री असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वगळता अन्य १९ मंत्र्यांकडे ३६ जिल्ह्यांची पालकमंत्री म्हणून जबाबदारी दिली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पालकमंत्री म्हणून सर्वाधिक सहा जिल्हे आहेत.
शिवसेनेचे पालकमंत्री : अर्थमंत्री फडणवीस यांनी भाजपच्या पालकमंत्र्यांना १ कोटी ५ लाख २ हजार रुपये तर शिवसेनेच्या पालकमंत्र्यांना ६८ लाख १५ हजार ५०० रुपये इतका निधी दिल्याचे नमूद केले आहे. त्यातील नागपूर जिल्ह्यासाठी सर्वाधिक ११ लाख ९२ हजार इतका निधी दिली आहे. त्या खालोखाल भाजपचे सुरेश खाडे (कामगार मंत्री ) यांच्या सांगली जिल्ह्यासाठी ११ लाख ७२ हजार आणि त्याखाली वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांच्या लातूर जिल्ह्यासाठी १० लाख ४१ हजार ५०० इतका निधी देण्यात आला आहे.
२ लाख ५४ हजार इतकाच निधी : शिवसेनेचे बंदरे आणि खनीकर्म मंत्री दादा भुसे यांचा या यादीत चौथा क्रमांक असून, नाशिक जिल्ह्यासाठी ९ लाख ८३ हजार ५०० इतका निधी देण्यात आला आहे. तर पाचव्या क्रमांकावर भाजपचे महिला बालविकास मंत्री, मुंबई उपनगरचे मंगल प्रभात लोढा असून त्यांना ९ लाख ५३ हजार ५०० इतका निधी देण्यात आला आहे. त्या तुलनेत शिवसेनेचे शिक्षणमंत्री, मुंबई शहराचे पालकमंत्री दीपक केसरकर यांना अवघे २ लाख ५४ हजार इतकाच निधी दिल्याचे नमुद केले आहे.