मुंबई -मालाडमध्ये आग लागण्याचे प्रकार सतत सुरूच आहे. रविवारी दुपारी 3:20 वाजता मुंबई मालाडमध्ये पुन्हा एकदा आगीची घटना घडली आहे. यावेळी अग्निशामन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आणि आग विझवली. यात कोणत्याही जीवित किंवा मालमत्तेचे नुकसान झाले नाही. अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की पी 3 नावाच्या स्टुडिओत आग लागली. सध्या आगीवर नियंत्रण मिळवले आहे.
मुंबई मालाडमध्ये स्टुडिओला आग, प्रकरणांत वाढ
मुंबई मालाड पश्चिम मारवे रोड स्थित पी 3 स्टुडिओला आग लागली होती. आगीत लाकडाचा स्टुडिओ सेट पेटला आहे असे सांगण्यात आले होते. त्यात अनेक पोशाख आणि वस्तू ठेवल्या होत्या त्यादेखील जळाल्या असे सांगितले होते.
मुंबई मालाडमध्ये स्टुडिओला आग
मारवे रोड स्थित पी 3 स्टुडिओला आग
मुंबई मालाड पश्चिम मारवे रोड स्थित पी 3 स्टुडिओला आग लागली होती. आगीत लाकडाचा स्टुडिओ सेट पेटला आहे असे सांगण्यात आले होते. त्यात अनेक पोशाख आणि वस्तू ठेवल्या होत्या त्यादेखील जळाल्या असे सांगितले होते. मात्र अग्निशमन दल घटनास्थळी पोहचले आणि आगीवर नियंत्रण मिळवले. सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही. मात्र मालमत्तेचे नुकसान झाले आहे.