मुंबई :भारतातील चित्रपट अभिनेत्री जिया खान तिची 10 वर्षा पूर्वी आत्महत्या झाली होती. तिची आत्महत्या होण्यामध्ये तिचा प्रियकर चित्रपट अभिनेता सुरज पंचोली हा कारणीभूत असल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला आहे. याबाबत सीबीआय विशेष न्यायालयात खटला सुरू आहे 28 एप्रिल रोजी याबाबत अंतिम निकाल येण्याची शक्यता आहे. या प्रकरणामधील महत्त्वाची सुनावणी गुरुवारी पार पडली.
मृत्यूला 10 वर्षे पूर्ण : तब्बल दहा वर्षांपूर्वी जिया खान ही आपल्या जुहू येथील घरामध्ये मृत पावली होती. आज तीच्या मृत्यूला 10 वर्षे होत आहेत .तिच्या आत्महत्या प्रकरणामुळे बॉलीवूड क्षेत्रामध्ये प्रचंड मोठी चर्चा झाली होती. दहा वर्षे झाले तिचा खटला सीबीआयच्या विशेष न्यायालयामध्ये सुरू आहे. याबाबत अभिनेत्री जिया खान हिच्या मृत्यूस अर्थात आत्महत्यासाठी कारणीभूत असलेला आरोपी अभिनेता सूरज पंचोली याच्याबाबत वकिलांनी युक्तिवाद केले. तर जिया खान हिच्या बाजूने देखील वकिलानी युक्तीवाद केले. सीबीआय विशेष न्यायालयाने याबाबतचा निकाल राखून ठेवला आहे. गुरुवारी याबाबत सीबीआय विशेष न्यायालयात सुनावणी पार पडली.
अभिनेता सुरज पंचोलीवर आरोप : अभिनेत्री जिया खान हिच्या आईने राबिया खानने सीबीआय न्यायालयाच्या न्यायाधीशासमोर गुरुवारी झालेल्या सुनावणी दरम्यान स्पष्ट केले की," तिची आत्महत्या नाही तर तिची हत्या केली गेलेली आहे. यासाठी आरोपी परिपूर्ण जबाबदार आहे. अराबिया खान यांनी आपल्या आरोपात नमूद केलं की अभिनेता सुरज हा जिया खान सोबत शारीरिक, मौखिक अत्यंत वाईट व्यवहार करत होता. त्याच्यामुळे त्याच्याकडूनच ही घटना घडलेली आहे.
न्यायालयात जोरदार युक्तीवाद : 2013 या कालावधीत 3 जून या दिवशी 25 वय असलेली जिया खान ही जुळतील आपल्या घरात मृत अवस्थेमध्ये आढळून आली होती. ती अमेरिकन नागरिकत्व स्वीकारलेली भारतीय व्यक्ती होती. तिच्या मृत्यूनंतर गेले दहा वर्षे झाले तपास सुरू आहे. तिचा जवळचा मित्र अभिनेता सुरज पांचोली याच्यावर आरोप आहे. मात्र आरोपीच्या वकिलांनी गुरुवारी झालेल्या सुनावणी दरम्यान आरोप फेटाळून लावले आहेत. सुरज पंचोली याची बाजू वकील प्रशांत पाटील मांडली. त्यात त्यांनी दावा केला, की आरोपीवर हा खटला आत्महत्येस प्रवृत्त करण्याच्या श्रेणीमध्ये बसत नाही, हे न्यायालयाने विचारात घ्यावे. कारण त्याबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या तसेच उच्च न्यायालयाच्या काही महत्त्वाच्या निकालांच्या आधारे दिसते असे त्यांनी न्यायालयात सांगितले.
पुढील सुनावणी 28 तारखेला : सुरज पंचोली हा आदित्य पंचोली यांचा मुलगा आहे. तब्बल दहा वर्षांपूर्वी जून महिन्यात पोलिसांनी जेव्हा जिया आत्महत्या प्रकरणात जिया खानने लिहिलेले पत्र जप्त केले. त्या आधारावर सीबीआयने सूरज पंचोली याच्यावर आरोप ठेवला आहे. जिया खानचे सूरज सोबत जवळचे नाते होते. मात्र, तो शारीरिक शोषण, मानसिक छळ देखील करीत असे त्या चिठ्ठीच्या आधारे स्पष्ट होते. त्यानेच आत्महत्या करण्यास तिला प्रवृत्त केले; असे म्हटले होते. या संपूर्ण प्रकरणावर गुरुवारी दोन्ही बाजूने युक्तिवाद मांडल्यानंतर सीबीआयच्या विशेष न्यायाधीशांनी सुनावणी पूर्ण केली. या बाबत पुढील सुनावणी 28 तारखेला होणार आहे.
हेही वाचा - Maratha Reservation : मराठा समाजाला मागास घोषित करा; मराठा क्रांती ठोक मोर्चाची मागणी