मुंबई - सोन्याच्या किंमती आज पुन्हा खाली आल्या आहेत. गेल्या चार दिवसांत सोन्याच्या दरामध्ये तिसऱ्यांदा घसरण झाली आहे. चांदीच्या दरातही काहीशी घट दिसून येत आहे. त्यामुळे सोने-चांदीचे खरेदीचे प्रमाण वाढले आहे.
शुक्रवारी सोन्याचा दर 213 पॉईंटवर बंद झाला. इंट्रा डे दरम्यान सोन्याने 49 हजार 54 रुपयांची पातळी गाठली. याचवर्षी सोन्याने 57 हजार 100 रुपयांची सर्वोच्च पातळीलाही गाठली होती. त्यादरापेक्षा 7 हजार रुपयांनी सोने सध्या स्वस्त आहे. सोन्यासह चांदीच्या दरातही घसरण झाली आहे. चांदी सध्या 380 रुपयांच्या घसरणीसह 63 हजार 350 रुपये प्रती किलो आहे.