मुंबई -राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Minister Nawab Malik) यांच्या अडचणी वाढतच आहेत. नवाब मलिक यांचा मुलगा फराज मलिक यांना ईडीने आज चौकशीकरिता बोलावले आहे. कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आणि त्यांच्या सहकार्यांमार्फत झालेल्या हवाला प्रकरणात ईडीकडून प्रश्न विचारले जाण्याची शक्यता आहे. फराज मलिकच्या वकिलाने ईडीला 7 दिवसांचा वेळ देण्याची विनंती केली होती. ज्यामुळे ते संबंधित कागदपत्रांसह ईडी कार्यालयात येऊ शकतील असे असे त्यांच्या वकीलांचे म्हणने होते मात्र ईडीने त्यांचे पत्र स्वीकारले नाही.
कागदपत्रे आणि पैशांची व्यवस्था केली
दाऊदची बहीण हसीना पारकर हिच्याकडून कुर्ला येथील मालमत्ता मलिक यांनी बेकायदेशीरपणे खरेदी केली. या खरेदीमध्ये त्यांचा मुलगा फराज हा सहभागी होता. कागदपत्रे आणि पैशांची व्यवस्था करण्यात फराजने पुढाकार घेतला होता असा आरोप ईडीने ठेवला आहे.