मुंबई - मागील 19 दिवसांपासून अजित पवार आणि त्यांच्या निकटवर्तीयांच्या घरी तसेच कार्यावर आयकर विभाग आणि इडीचे छापे सुरू आहेत. हजारो करोडची अजित पवार आणि मित्रपरिवारांची संपत्ती ईडीने जप्त केल्याची माहिती भाजप नेते किरीट सोमैया यांनी दिली आहे.
किरीट सोमैया यांनी दिलेल्या माहितीनुसार, जरंडेश्वर साखर कारखाना तब्बत 600 कोटी, दिल्ली येथील घर 20 कोटी, पार्थ पवार यांचे कार्यालय 25 कोटी, गोवा येथील रिसॉर्ट 250 कोटी, अशी काही संपत्ती आयकर विभागाने तात्पुरत्या स्वरुपात जप्त करण्याचे आदेश दिली आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार, त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार, अजित पवार यांच्या मातोश्री आशा पवार, पुत्र पार्थ पवार त्यांच्या दोन्ही बहिणी विजया पाटील आणि निता पाटील तसेच जावई, असे जप्त केलेल्या संपत्तीचे मालक आहेत. यामध्ये बिल्डर असलेले अजित पवार यांचे दोन मित्र देखील आहेत. यावर ईडी आणि आयकर विभागाची कारवाई सुरू आहे, असेही सोमैया म्हणाले.