मुंबई- प्रशासन मदत करत नाही. तर जे आम्हाला पाठींबा देतात त्यांनाच आमच्यापासून वेगळे करण्याचा प्रयत्न करत आहेत. पोलीस आमच्यावर दबाव आणत आहेत, असा आरोप दिव्यांशचे वडील सूरज सिंग यांनी केले आहे.
पोलीस आमच्यावर दबाव आणत आहेत; दिव्यांशच्या वडिलांचा पोलिसांवर आरोप - मुंबई महानगरपालिका
पोलीस आमच्यावर दबाव आणत आहेत, असा आरोप दिव्यांशचे वडील सूरज सिंग यांनी केले आहे. प्रशासन आम्हाला मदत करत नसून आम्हाला जे पाठिंबा देत आहेत त्यांना आमच्यापासून वेगळे करण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचेही त्यांनी यावेळी म्हटले.
दिव्यांशच्या वडिलांनी केले पोलिसांवर आरोप
जिथे रेस्क्यू ऑपरेशन सुरू होते त्या प्रेमनगर नाल्याच्या ठिकाणी आम्ही गेलो होतो. तेथून परत येत असताना सामाजिक कार्यकर्ते श्रवण तिवारीला पोलिसांनी पुन्हा ताब्यात घेतले आणि दुसऱ्या बाजूने पोलीस त्याला घेऊन गेले. पोलीस नेमके असे का करत आहेत ? असा प्रश्न यावेळी सूरज सिंग यांनी उपस्थित केला आहे.