महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jun 29, 2021, 10:43 AM IST

ETV Bharat / state

कोरोनाची बनावट लसीकरण करणाऱ्या डॉक्टराचा जामीन न्यायालयाने नाकारला; अखेर आरोपी कोर्टात शरण जाणार

हीरानंदानी हेरिटेज सोसायटी येथे आयोजित शिबिराच्या दरम्यान कोरोनाच्या बनावट लसीशी संबंधित प्रकरणी डॉ मनीष त्रिपाठी आरोपी आहे. आरोपी डॉक्टर त्रिपाठी हे मुंबईतील कांदिवली भागात आपले नर्सिंग होम चालवतात.

कोरोनाची बनावट लसीकरण करणाऱ्या डॉक्टराचा जामीन न्यायालयाने नाकारला
कोरोनाची बनावट लसीकरण करणाऱ्या डॉक्टराचा जामीन न्यायालयाने नाकारला

मुंबई -महानगरतील दिंडोशी कोर्टाने बनावटकोविड लसीकरण शिबिर प्रकरणात आरोपी डॉक्टर मनीष त्रिपाठी यांना अटकपूर्व जामीन मंजूर करण्यास नकार दिला आहे. आरोपी डॉक्टर त्रिपाठी हे मुंबईतील कांदिवली भागात आपले नर्सिंग होम चालवत आहेत. हीरानंदानी हेरिटेज सोसायटी येथे आयोजित शिबिराच्या दरम्यान कोरोनाच्या बनावट लसीशी संबंधित प्रकरणात डॉ मनीष त्रिपाठी आरोपी आहे.


आरोपींविरूद्ध गुन्हेगारी मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
आरोपी डॉ मनीष त्रिपाठी यांचे वकील आदिल खत्री यांनी न्यायालयात अर्ज दाखल केला. ज्यामध्ये असे सांगितले गेले आहे की, त्याचा क्लायंट मंगळवारी बोरिवली दंडाधिकारी न्यायालयासमोर शरण जाईल. यावेळी त्यांनी दावा केला की पोलीस त्याच्या क्लायंट आणि कुटुंबातील सदस्यांवर अत्याचार करत आहेत. त्याला या प्रकरणात अडकवून बळीचा बकरा बनविण्यात आला आहे. सुनावणीदरम्यान सरकारी वकील उषा जाधव यांनी या प्रकरणातील आरोपी डॉक्टरांना देण्यात आलेल्या सवलतीस विरोध दर्शविला. त्या म्हणाल्या की, प्राथमिक तपासात या प्रकरणात आरोपींचा सहभाग असल्याचे आढळले आहे. तपासणीत असे दिसून आले आहे की, लोकांना लसच्या नावाखाली डिस्टिल्ड वॉटर देण्यात आले आहे. ही अत्यंत गंभीर बाब आहे. त्यानंतर आरोपी या प्रकरणात फरार आहे. तेव्हापासून सोसायटीने आरोपीविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपींविरूद्ध गुन्हेगारी मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे.

काय आहे प्रकरण
हीरानंदानी हेरिटेज सोसायटी येथे आयोजित शिबिराच्या दरम्यान कोरोनाच्या बनावट लसीशी संबंधित प्रकरणी डॉ मनीष त्रिपाठी आरोपी आहे. आरोपी डॉक्टर त्रिपाठी हे मुंबईतील कांदिवली भागात आपले नर्सिंग होम चालवतात. त्यांना लसीकरणासाठी बनावट लस चारकोपच्या शिवम हॉस्पिटलमधून पुरविली जात होती, त्यामुळे या रुग्णालयाच्या डॉ शिवराम पटेरिया आणि नीता पतरिया यांनाही अटक करण्यात आली आहे. या आरोपींमध्ये आतापर्यंत हिरानंदानी हेरिटेज सोसायटी, बोरिवलीचे आदित्य कॉलेज (225 लोक), मानसी शेअर्स आणि स्टॉक बोरिवली वेस्ट (514 लोक), पोदार एज्युकेशन सेंटर परळ (207 लोक), टिप्स कंपनी अंधेरी (151लोक), टिप्स कंपनी खार यांचा समावेश आहे. (206 लोक), बँक ऑफ बडोदा लिंक रोड शाखा मालाड येथे लसीकरण शिबिरात (40 लोक) बनावट लस टोचली असल्याची माहिती आहेConclusion:

ABOUT THE AUTHOR

...view details