महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

गरीब नॉन-कोविड रुग्णांच्या कोरोना चाचणीचा आणि उपचाराचा खर्च राज्य सरकारने करावा; खासदार राहुल शेवाळे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी - Corona Test

राज्यभरातील सरकारी आणि पालिकेच्या रुग्णालयांमध्ये कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार केले जात आहेत. यामुळे गरीब आणि मध्यमवर्गीय नॉन-कोविड (डायलिसीस, कॅन्सर आणि इतर रुग्ण) रुग्णांना या रुग्णालयांमध्ये उपचारासाठी जाता येत नाही. अशा परिस्थितीत नाईलाजाने या रुग्णांना खासगी रुग्णालयांमध्ये जावे लागत आहे.

MP Rahul Shewale
खासदार राहुल शेवाळे

By

Published : Apr 29, 2020, 11:49 AM IST

मुंबई - राज्य सरकार आणि महानगरपालिकेची रुग्णालये कोरोनाबाधितांच्या उपचारासाठी राखीव ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे गरीब आणि मध्यमवर्गीय नॉन-कोविड रुग्णांना, नाईलाजास्तव खासगी रुग्णालयात उपचारासाठी जावे लागत आहे. या नॉन-कोविड रुग्णांच्या उपचाराचा खर्च राज्य सरकारने करावा, अशी मागणी खासदार राहुल शेवाळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

गरीब नॉन-कोविड रुग्णांच्या कोरोना चाचणीचा आणि उपचाराचा खर्च राज्य सरकारने करावा

राज्यभरातील सरकारी आणि पालिकेच्या रुग्णालयांमध्ये कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार केले जात आहेत. यामुळे गरीब आणि मध्यमवर्गीय नॉन-कोविड (डायलिसीस, कॅन्सर आणि इतर रुग्ण) रुग्णांना या रुग्णालयांमध्ये उपचारासाठी जाता येत नाही. अशा परिस्थितीत नाईलाजाने या रुग्णांना खासगी रुग्णालयांमध्ये जावे लागत आहे. मात्र, येथे उपचार करण्यापूर्वी प्रत्येक रुग्णाची कोरोना चाचणी खासगी लॅबकडून केली जात आहे. याचा खर्च सामान्य रुग्णांकडूनच वसूल केला जात आहे.

खासगी कोरोना चाचणीचा खर्च आणि खासगी उपचाराचा खर्च असा दुहेरी भुर्दंड सामान्य रुग्णांना सोसावा लागत आहे. या गंभीर परिस्थितीचा विचार करून, गरीब आणि मध्यमवर्गीय नॉन-कोविड रुग्णांची कोरोना चाचणी आणि त्यांच्या उपचाराचा खर्च राज्य सरकारने करावा, अशी विनंती खासदार शेवाळे यांनी केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details