मुंबई :भारत जोडो यात्रेत पत्रकारांशी बोलताना राहुल गांधी यांनी सावरकरांनी इंग्रजांनी सावरकरांना लिहलेले पत्र वाचून दाखवले. त्यांच्या सावरकरांवरील वक्तव्याचा वाद राज्यात चांगलाच पेटला आहे. या प्रकरणी राहुल विरोधात पोलीस तक्रार आणि गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काल पासुन त्यांचा ठिकठिकाणी निषेध होत आहे. तर आज मुंबई आणि पुणे येथे भाजपने जोरदार आंदोलन सुरु केले आहे. तर मनसेनेही राहुल गांधी यांच्या शेगाव येथिल सभेत निदर्शने करण्याचे नियोजन केले आहे.
काय आहे वाद :स्वातंत्रबीर विनायक दामोदर सावरकर हे माफीवीर आहेत अशी टीका करत राहुल गांधी यांनी भाजप आणि आरएसएसला कायम लक्ष्य केले आहे. भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात आल्यावर त्यांनी पुन्हा हा मुद्दा पुढे आणला गुरवारी झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी सावरकरांनी इंग्रजांना लिहलेले पत्र वाचून दाखवले. सावरकर यांच्याबाबत मी जे वक्तव्य केले होते. त्यात चुकीचे काहीच बोललो नाही, जे ऐतिहासिक सत्य आहे तेच मी मांडले, हे सांगताना त्यांनी महात्मा गांधी, पंडित नेहरू, सरदार पटेल यांनाही इंग्रजांनी तुरुंगात डांबले होते, पण त्यांनी ब्रिटीश सरकारला पत्र लिहून आपली सुटका करुन घेतली नाही. हा या दोन विचारधारेतील फरक आहे.असे वक्तव्य केले.सावर
सावरकरांच्या नातुची तक्रार:राहुल गांधींच्या वक्तव्या नंतरच वीर सावरकरांचे नातू रणजीत सावरकर यांनी राहुल गांधींविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली ( Ranjit Savarkar complaint of Rahul Gandhi ) आहे. सावरकरांनी माफी मागितल्याचे पुरावने नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो अभियाना दरम्यान स्वातंत्रवीर सावरकर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केले त्यानंतर सावरकरांच्या नाताने पोलीस तक्रार करत राहुल गांधींना अटक करण्याची मागणी केली.
सावरकरांबाबत जनभावना तीव्र :राहुल गांधी असले उद्योग नेहमीच करत असतात. जेव्हा त्यांना काही मुद्दा उरत नाही. आपल्याला कोण किंमत देत नाही हे जेव्हा त्यांच्या लक्षात येते. तेव्हा ते अशी खळबळजनक वक्तव्य करतात. आपण पाहिले असेल माध्यमांनी देखील त्यांच्या भारत जोडो यात्रेची काही दखल घेतलेली नाही. सावरकरांबाबत लोकांची जनभावना तीव्र आहे. हे लक्षात घेऊनच राहुल गांधी अशी वक्तव्य करतात. आणि अशा वक्तव्याची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे काही दखल घेत नाही हे दुर्दैव आहे असेही रणजीत सावरकर यांनी म्हटले होते.
राहुल गांधींनी सावरकरांचा अपमान केल्याचा आरोप सावरकरांचा अपमान केल्याचा आरोप :राहुल गांधीच्या विधानामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली. सर्वच विरोधी पक्ष राहुल गांधी यांच्या विरोधात एकवटले. बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या महिला शहर अध्यक्ष अनिता सुहास डोंगरे यांनी ठाणे नगर पोलिसांनी स्थानकात तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीची दखल घेऊन ठाणे नगर पोलिसांनी राहुल गांधी यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. अंदमान येथील तुरुंगात दोन जन्मठेपे भोगत असलेल्या सावरकरांनी एकूण 14 वर्षे काळ्यापाण्याची शिक्षा भोगली व त्यानंतर त्यांना रत्नागिरी येथे नजर कैदेत ठेवण्यात आले. अशा महान क्रांतिकारकाचा राहुल गांधी यांनी अपमान केल्याने आपल्या भावना दुखावल्या मुळेच, त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केल्याची माहिती बाळासाहेबांचे शिवसेना पक्षाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी दिली.
राहुल गांधीं विरोधात गुन्हा दाखल राहुल गांधींविरोधात गुन्हा दाखल : लोकसभा खासदार राहूल गांधी यांच्याविरोधात ठाणे जिल्ह्यातील ठाणे नगर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला ( Case filed against Rahul Gandhi ) आहे. आपीसी कलम 500, 501 अन्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. क्रांतीकारक स्वातंत्र्य वीर सावरकरांवर केलेल्या वक्तव्यानंतर ही तक्रार नोंदवण्यात आली होती.
सावरकरांवरील वक्तव्याचा वाद पेटला युवक काँग्रेसकडून पोस्टरबाजी :राज्यभर राहुल गांधी यांच्या विरोधात आंदोलन केले जात आहे.तर राहुल गांधी हे आपल्या विधानावर ठाम असल्याचे पाहायला मिळत आहे.अश्यातच आत्ता पुण्यात युवक काँग्रेसचे सरचिटणीस रोहन सुरवसे पाटील यांच्याकडून स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या स्मारका बाहेर मफिविर तसेच राहुल गांधी सादर केलेले पत्र फ्लेक्स च्या माध्यमातून लावण्यात आले आहे.आज सकाळी हे पोस्टर सावरकर प्रेमिकडून फाडण्यात आल आहे. पुण्यातील सारसबाग येथील परिसरातील स्वतंत्रवीर सावरकर यांच्या पुतळ्याच्या बाहेर तसेच डेक्कन येथील स्वतंत्रवीर सावरकर भवन बाहेर माफीवीर आणि राहुल गांधी यांनी सादर केलेलं पत्र याच पोस्टर करून ते लावण्यात आले होते.आत्ता ते फाडण्यात आले आहे.
मनसेने राहुल गांधींची सभा उधळण्याचे नियोजन केले होते मनसेचा गनिमी कावा : राहुल गांधी यांची शेगाव येथील सभा उधळून लावण्याचा उद्देशाने मनसेने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.. मनसे नेता संदीप देशपांडे, ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधवसह असंख्य मनसे कार्यकर्ते गनिमी काव्याने शेगाव येथील सभेत जाऊन मनसे स्टाईलने निषेध नोंदवतील असा निर्धार देशपांडे यांनी बोलून दाखवला होता. मात्र मनसे कार्यकर्त्यांना मोठ्या बंदोबस्तामुळे तीथ पर्यंत पोचता आले नाही. खामगाव आणि इतर ठिकाणी मनसेने निदर्शने केली. तसेच राहुल गांधींच्या सभेत त्यांच्या भाषनाच्यावेळी काही कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवुन आपला रोष व्यक्त केला.
पुण्यात काॅग्रेस कार्यकर्त्यांचे भाजप कार्यालयासमोर निदर्शने काँग्रेसचेही आंदोलन : राहुल गांधी यांच्या वक्तव्या वरुन वाद चिघळला. त्यावरुन काँग्रेस भाजप आमने-सामने आले. पुण्यात काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजप कार्यालया बाहेर जोरदार निदर्शने केली. सावरकर माफीवीरच आहेत असा आरोप काँग्रेसने केला आहे. भाजपने सावरकरांच्या विधानावरून काँग्रेस भावनवर आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पुण्यात भाजप कार्यालयावर काँग्रेस कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. पोलिसांनी आधी पासूनच या ठिकाणी मोठा बंदोबस्त ठेवला होता. कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.