मुंबई:आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजलेल्या टाटा मुंबई मॅरेथॉन यामध्ये भाग घेण्यासाठी देशभरातून धावपटू येतात. त्याचबरोबर धावपटूंना प्रोत्साहित करण्यासाठी तसेच त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मुंबई उपनगरातून मोठ्या प्रमाणात शुभचिंतक येतात. त्यांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेने दोन स्पेशल ट्रेन सोडण्याचा निर्णय घेतला आहे. मेन लाईन आणि हार्बर मार्गावर या गाड्या सोडण्यात येणार असून त्यामुळे स्पर्धकांना, प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल. मेन लाईन वर कल्याण सीएसएमटी लोकल कल्याण स्थानकातून रविवारी पहाटे ३ वाजता सुटणार असून सीएसएमटी ला पहाटे ४:३० वाजता ती पोहोचणार आहे. हार्बर मार्गावर पहाटे ३ वाजता सुटलेली लोकल सीएसएमटी स्थानकात सकाळी ४:३० वाजता येईल. ह्या लोकल धीम्या मार्गावर चालवण्यात येणार असल्याने सर्व स्थानकावर थांबणार आहेत. पश्चिम रेल्वेवर सुद्धा विरार ते चर्चगेट आणि चर्चगेट ते वांद्रे दरम्यान अतिरिक्त धीम्या गाड्या चालवण्यात येणार आहेत.
ड्रीम रन मध्ये धावणार २० महिला सरपंच :संपूर्ण मॅरेथॉनमध्ये ड्रीम रन या गटामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये स्पर्धक सहभागी होत असून ड्रीम रन हीस्पर्धा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरते. यंदाचे या वर्षाचे वैशिष्ट्य म्हणजे महिला सक्षमीकरणात रोल मॉडेल आणि अग्रेसर असलेल्या २० महिला सरपंचांचा सहभाग या टाटा, मुंबई मॅरेथॉन मध्ये असणार आहे. हौशी धावपटू पूर्ण मॅरेथॉन ४२.१९५ किलोमीटर ही स्पर्धा सकाळी ५.१५ मिंटानी सीएसएमटी येथून सुरुवात होईल. त्यानंतर हा असणारी अर्ध मॅरेथॉन २१.०९७ किमी पोलीस कप ही स्पर्धा माहीम दर्गा उरूस मैदान येथून सकाळी ५.१५ मिनिटांनी सुरुवात होईल. १० किलोमीटर रन ही स्पर्धा सीएसएमटी येथून ६ वाजता सुरू होईल. मॅरेथॉन एलिट गट ४२.१५ किलोमीटर ही मुख्य स्पर्धा सीएसएमटी येथून ७.२० मिनिटांनी सुरू होईल. चॅम्पियन विथ डिजाबिलिटी रन ही १:०३ किलोमीटरची स्पर्धा सीएसएमटी येथून ७:२५ मिनिटांनी सुरू होईल. सीनियर सिटीजन रन ४:२ ही स्पर्धा सीएसएमटी येथून सकाळी ७.४५ मिनिटांनी सुरू होईल आणि सर्वात नावाजलेली ड्रीम रन ५.०९ किलोमीटर ही स्पर्धा सीएसएमटी येथून सकाळी ८.०५ मिनिटांनी सुरू होईल.