मुंबई -काँग्रेस-राष्ट्रवादी व शिवसेनेमध्ये सत्तावाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाल्याचे संकेत राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी दिले आहेत. एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना त्यांनी मुख्यमंत्री शिवसेनेचा होणार, असे वक्तव्य केले आहे.
BREAKING: मुख्यमंत्री निश्चितपणे शिवसेनेचा होणार - नवाब मलिक - नवाब मलिक
राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी मुख्यमंत्री शिवसेनेचा होणार असे वक्तव्य केले आहे. कार्यकाळ किती असेल याबद्दल मात्र मलिक बोलले नाहीत.
राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक
नवाब मलिक म्हणाले, "एक प्रश्न पुन्हा-पुन्हा विचारला जातोय की, मुख्यमंत्री शिवसेनेचा होणार का? मुख्यमंत्रीपदावरून शिवसेना-भाजपमध्ये वाद झाला. त्यामुळे निश्चितच मुख्यमंत्री शिवसेनेचा होईल. शिवसेनेला अपमानित केले गेले आहे. आघाडी त्यांचा सन्मान करेल" कार्यकाळ किती असेल याबद्दल मात्र मलिक बोलले नाहीत.
Last Updated : Nov 15, 2019, 11:32 AM IST