मुंबई- कोरोना संसर्गामुळे मृत्यू झालेल्या डॉक्टरांची आकडेवारी नसल्याची माहिती चक्क संसदेत केंद्र सरकारकडून देण्यात आली आहे. केंद्राच्या या माहितीनंतर इंडियन मेडिकल असोसिएशनने प्रचंड संताप व्यक्त केला आहे.
कोरोनामुळे मृत्यू झालेल्या डॉक्टरांची केंद्राकडे नाही आकडेवारी, आयएमएने व्यक्त केला संताप
आयएमएने नाराजी व्यक्त केली असून आयएमएचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. राजन शर्मा यांनी केंद्र सरकारला खरमरीत पत्र लिहीत आपली नाराजी व्यक्त केली आहे. केंद्राकडे कोरोनामुळे मृत्यू झालेल्या डॉक्टरांची आकडेवारी नाही यावरून सरकारला साथरोग नियंत्रण कायदा लागू करण्याचा नैतिक अधिकारच नसल्याची तिखट प्रतिक्रिया त्यांनी दिली.
आतापर्यंत ३८२ खासगी डॉक्टरांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती आहे. आरोग्य राज्यमंत्री अश्विनी चौबे यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना कोरोनामुळे मृत्यू झालेले आरोग्य कर्मचारी व डॉक्टरांचा कोणताही डेटा केंद्राकडे नाही. मुळात ही सर्व माहिती त्या त्या राज्याकडे असते, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले. या स्पष्टीकरणानंतर आयएमएने नाराजी व्यक्त केली असून आयएमएचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. राजन शर्मा यांनी केंद्र सरकारला खरमरीत पत्र लिहीत आपली नाराजी व्यक्त केली आहे. केंद्राकडे कोरोनामुळे मृत्यू झालेल्या डॉक्टरांची आकडेवारी नाही यावरून सरकारला साथरोग नियंत्रण कायदा लागू करण्याचा नैतिक अधिकारच नसल्याची तिखट प्रतिक्रिया त्यांनी दिली. तर, कोरोनामुळे मृत्यू झालेल्या डॉक्टरांना 'शहीद' म्हणून सन्मानित करण्याची मागणीही आयएमएने आपल्या पत्रातून उचलून धरली आहे.
हेही वाचा- भारतात फुटबॉलला प्राधान्य नसल्याची छोट्या फुटबॉलपटूची खंत