महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'बार्ज पी 305' दुर्घटनेला कॅप्टन कारणीभूत, कर्मचाऱ्यांनी सांगितला थरारक घटाक्रम... - Barge P305 Rescue operation

तौक्ते चक्रीवादळात अरबी समुद्रात अडकलेल्या पी 305 या बार्जमधील एकूण 188 जणांना बुधवारी (दि. 19 मे)वाचवण्यात नौदलाला यश आले आहे. तर, 37 जणांचे मृतदेह अरबी समुद्रातून बाहेर काढले आहेत. नेमके काय घडले होते पी 305 बार्जवर, बचाव कार्यावेळी कोणकोणत्या अडचणींचा सामना करावा लागला, चक्रीवादळाची पूर्व सूचना मिळाली होती की नाही, कसा होता तो थरार, याबाबत बार्जवरील कर्मचाऱ्यांकडून जाणून घेण्याचा प्रयत्न 'ईटीव्ही भारत'च्या प्रतिनिधीने केला आहे.

घटनास्थळ
घटनास्थळ

By

Published : May 20, 2021, 5:23 PM IST

मुंबई - बार्ज पी 305 वर 270 कर्मचारी काम करत होते. यातील सुमारे 60 ते 70 जण बेपत्ता असल्याची माहिती बार्जवर काम करणार्‍या कर्मचार्‍यांनी दिली आहे. वादळाची सूचना बार्जच्या कॅप्टन प्रताप यांना मिळाली होती. मात्र, कॅप्टन प्रतापचा निष्काळजीपणा हा अनेक मृत्यूला कारणीभूत ठरला आहे, अशी माहिती बार्जवर काम करणाऱ्या अभिषेक आव्हाड आणि विशाल केदार या दोघांनी दिली.

बातचित करताना प्रतिनिधी

वादळ येण्यापूर्वी बार्ज पी 305च्या कॅप्टनला सूचना करण्यात आली होती. त्यांना मुंबईच्या दिशेने रवाना होण्यासही सांगण्यात आले होते. मात्र, या सूचनांचे पालन कॅप्टनकडून झाले नाही आणि मोठा अनर्थ झाला. या बार्जवर काम करणारे तब्बल 270 जण मृत्यूच्या दाढेत अडकले होते. यातील अनेकांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला आहे. उसळणार्‍या लाटा, सोसाट्याच्या वाऱ्याचा मार तब्बल 270 कर्मचारी पाच ते सहा तास सहन करत होते. कशाप्रकारे ते बचाव कार्य चालले, कोण-कोणत्या अडचणींचा सामना येथील कर्मचाऱ्यांना करावा लागला, याबाबत माहिती बार्जवर काम करणाऱ्या व दुर्घटनेतून वाचणाऱ्या दोघांनी 'ईटीव्ही भारत'ला दिली.

हेही वाचा- 'पी-305 बार्ज'मधील 22 कर्मचाऱ्यांचा मृत्यू; जेजे रुग्णालयात आणले मृतदेह

ABOUT THE AUTHOR

...view details