मुंबई- शहरातील शिवडी स्थानकाजवळील फातिमा हायस्कूलजवळ पूल नसल्याने स्थानिकांसह विद्यार्थ्यांना भरधाव रहदारी असलेला रस्ता ओलाडून जावे लागत होते. त्यामुळे पालिकेने या ठिकाणी अपघाताचा धोका टाळण्यासाठी एक दिलासादायक निर्णय घेतला आहे. महापालिकेने आता आर. ए. किडवाई या मार्गावर पादचारी पूल बांधण्याचे ठरवले आहे. त्यासाठी पालिका ८२ लाख ११ हजार १२२ रुपये खर्च करणार आहे.
मुंबई महापालिका शिवडीमधील किडवाई मार्गावर बांधणार पूल - studentc
आर. ए. किडवाई मार्ग येथे पूल नसल्याने पादचाऱ्यांना तसेच विद्यार्थ्यांना रस्ता ओलांडावा लागतो. रस्ता ओलांडताना अपघाताचा धोका असल्याने स्थानिकांकडून या ठिकाणी पूल बांधण्याची मागणी केली जात होती.
मुंबईमधील हार्बर मार्गावरील शिवडी स्थानकाजवळ फातिमा हायस्कूल जवळ आर. ए. किडवाई मार्ग येथे पूल नसल्याने पादचाऱ्यांना तसेच विद्यार्थ्यांना रस्ता ओलांडावा लागतो. रस्ता ओलांडताना अपघाताचा धोका असल्याने स्थानिकांकडून या ठिकाणी पूल बांधण्याची मागणी केली जात होती. स्थानिकांच्या मागणीनुसार पालिकेने कम्पोझिट कम्बाईन टेक्नोक्रँटेस प्रा. लि. या कंपनीकडून सल्ला घेतला आहे.
सल्लागाराने दिलेल्या सल्ल्यानंतर पावसाळा वगळता १० महिन्यात हे काम पूर्ण करण्याच्या अटीवर कुवाला कॉर्पोरेशन कंपनीला पूल बांधण्याचे कंत्राट दिले जाणार आहे. तसा प्रस्ताव पालिकेच्या स्थायी समितीत मंजुरीसाठी सादर करण्यात आला आहे. स्थायी समिती व पालिका सभागृहाच्या मंजुरी नंतर या पुलाच्या बांधकामाला सुरुवात होणार आहे.