महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पावसाळ्याच्या तोंडावरही पालिका बांधेना पवईतील नाल्यावरील पूल; रहिवासी त्रस्त - पालिका

पवई येथील जयभीमनगर व मोरार्जीनगरला जोडणारा नाल्यावरील हा पूल 1994 च्या सुमारास स्थानिक नागरिकांनी आपली गैरसोय दूर व्हावी यासाठी दगड गोट्यांचा भराव नाल्यात टाकून तयार केला होता. त्यावरून ते मार्गक्रमण करत होते.

पवईतील नाल्यावरील पूल पावसाळ्याच्या तोंडावरही पालिका बांधेना

By

Published : Jun 6, 2019, 9:13 AM IST

Updated : Jun 6, 2019, 9:22 AM IST

मुंबई- पवई येथील जयभीमनगर नाल्यावरील पूल पालिकेने काही दिवसांपूर्वी पाडला होता. त्यानंतर पर्यायी व्यवस्था न दिल्याने येथील रहिवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. पावसाळा तोंडावर आल्याने स्थानिक रहिवाश्यांनी पूल तोडलेल्या जागेवर दगड गोटे टाकून नाल्यातून मार्ग बनवला आहे. त्यामुळे महिला, लहान मुले जीव मुठीत धरून नाल्यातून जात आहेत. त्यामुळे या पुलाचे काम लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी स्थानिकानी केली आहे.

पवईतील नाल्यावरील पूल पावसाळ्याच्या तोंडावरही पालिका बांधेना; रहिवाशी त्रस्त

पवई येथील जयभीमनगर व मोरार्जीनगरला जोडणारा नाल्यावरील हा पूल 1994 च्या सुमारास स्थानिक नागरिकांनी आपली गैरसोय दूर व्हावी यासाठी दगड गोट्यांचा भराव नाल्यात टाकून तयार केला होता. त्यावरून ते मार्गक्रमण करत होते. त्यानंतर महानगरपालिकेच्या पूल व बांधकाम विभागाने हा पूल पक्का तयार करून उभारला आणि रहदारीसाठी खुला केला होता.

हा पूल 14 मे ला महापालिकेने पूर्णपणे काढून टाकला आहे. अद्याप याठिकाणी नवीन पुलाचे काम सूरू झाले नसल्याचे स्थानिक रहिवासी पवन पाल यांनी सांगितले. या कामाची निविदा निघाल्याची पालिका माहिती देते मग कामाचे काय झाले अजून माहिती नाही. त्यामुळे आम्ही आमच्या त्रासाला पाहून कच्चा प्रकारे भराव टाकून ये जा करण्यासाठी मार्ग तयार केल्याचे येथील स्थानिक सांगतात.

रोज 4 हजार पेक्षा अधिक रहिवासी या पुलाचा उपयोग करत होते. पूल तोडल्यामुळे आम्हाला तब्बल दीड किलोमीटरचा वळसा घालून जावे लागत आहे. तसेच शौचालय घराच्या विरुद्ध दिशेला असल्यामुळे आम्हाला दीड किलोमीटरचा वळसा घालून जावे लागत असल्याचे स्थानिक रहिवासी रवी वाकुडे यांनी सांगितले. तसेच या पुलाचे काम लवकर सुरू करण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे.

Last Updated : Jun 6, 2019, 9:22 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details