महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Javed Akhtar Defamation Case : जावेद अख्तर-कंगना राणावत वादावर 23 मार्चला उच्च न्यायालयात सुनावणी

प्रसिद्ध अभिनेत्री कंगना राणावत हिच्या विरोधात प्रख्यात गीतकार जावेद अख्तर यांनी मानहानीचा खटला मुंबई उच्च न्यायालयामध्ये दाखल केला. आधी मुंबईतील मेट्रोपॉलिटीन मॅजेस्टेट यांच्या कोर्टात हा खटला दाखल केला होता.

Javed Akhtar Defamation Case
Javed Akhtar Defamation Case

By

Published : Mar 6, 2023, 9:51 AM IST

मुंबई :प्रख्यात गीतकार जावेद अख्तर यांनी नोव्हेंबर 2020 मध्ये कंगना राणावत हिच्याबाबत तक्रार केली होती. त्यांनी त्यात म्हटले होते की, टीव्ही मुलाखत सुरू असताना कंगनाने आपल्या सन्मानाला धक्का देणारे अपमानजनक विधान केले होते. त्या विधानामुळे जावेद अख्तर यांच्या प्रतिष्ठेला हानी पोहोचवली गेली आहे.


कंगना राणावत विरुद्ध जावेद अख्तर : अंधेरी मॅजिस्ट्रेट कोर्टामध्ये हा दाखल खटला आता मुंबई उच्च न्यायालयापर्यंत पोहोचलेला आहे. यासंदर्भात लवकरात लवकर सुनावणी व्हावी अशी गीतकार जावेद अख्तर यांची मुंबई उच्च न्यायालयात विनंती होती. त्यामुळे त्यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये न्याय मिळेल. या आशेने या ठिकाणी तात्काळ धाव घेतली होती. त्यामुळे न्यायालयाने जावेद अख्तर यांच्या विनंतीची दखल घेत कंगनाला या आधीच उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले होते. त्यामुळे आता कंगना राणावत विरुद्ध जावेद अख्तर यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या तक्रारीवर लवकरात लवकर सुनावणी होईल ही जी मागणी आहे ती मान्य केली गेली. आता या मानहानीच्या तक्रारीवर 23 मार्च 2023 रोजी मुंबई उच्च न्यायालयामध्ये सुनावणी होईल.


कौतूकाचा वर्षाव करण्याचा प्रयत्न : कंगना राणावत जावेद अख्तर यांच्यावर दरम्यान काही खोचक पण कौतूकाचा वर्षाव करण्याचा देखील प्रयत्न केला. जावेद अख्तर नुकतेच पाकिस्तानमध्ये जाऊन आले. पाकिस्तानात जाऊन त्यांनी तेथील नागरिकांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तरे दिली. त्यांनी सांगितले की, मुंबईवरील हमल्याचे आतंकवादी इथे काय इजिप्त किंवा इतर देशातून नव्हते आलेले, ते तुमच्या देशातून आलेले होते. याबद्दल हिंदुस्तानी लोकांनी जर काही प्रश्न विचारला, तर त्याबद्दल वाईट वाटून घेतले नाही पाहिजे. हे विधान त्यांनी पाकिस्तान केले. त्यावर कंगना राणावतने मोठी मजेशीर प्रतिक्रिया देखील दिली होती.


कंगना राणावतचे ट्विट :कंगना राणावतने ट्विटमध्ये जावेद अख्तर यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली ती म्हणाली की, जावेद अख्तर साहेबांची कविता मी जेव्हा जेव्हा ऐकते तेव्हा मला वाटायचे की देवी सरस्वतींचा त्यांच्यावर कायम आशीर्वाद आहे. कारण ते बोलतात त्यावेळेला जणू देवी सरस्वतीच बोलते असे वाटते. पण आता बघा माणसात काहीतरी खरे पण आहे. त्यांच्यासोबत परमेश्वर आहे, म्हणून घरात घुसून मारले, जय हिंद. मात्र, जावेद अख्तर यांनी तिच्यावर दाखल केलेला मानहानीचा खटला, आता मुंबई उच्च न्यायालयात पोहोचला आहे. त्यामुळे या खटल्यात काय निकाल लागतो याबाबत जनतेच्या मनात उत्सुकता आहे.

हेही वाचा :Malaika Arora photoshoot : मलायका अरोरा नवीनतम फोटोशूटमध्ये तिच्या स्टाईल गेममध्ये व्हाइट सिक्वेन्स्ड कॉर्ड्समध्ये अव्वल

ABOUT THE AUTHOR

...view details