मुंबई -भांडुपच्या सोनापूर परिसरातून अकरा वर्षीय चिमुकलीचे अपहरण झाल्याची घटना समोर आली होती. या मुलीचा मृतदेह विद्याविहार स्थानकाजवळील रेल्वे रुळाजवळ पोलिसांना सापडला आहे. याप्रकरणी एका संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. वैद्यकीय अहवालात लैंगिक मुलीवर अत्याचार करून गळा दाबल्याने तिचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. त्यानुसार भांडुप पोलिसांनी अपहरण, हत्या, बलात्कार आणि पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे भांडुप परिसरात घबराट पसरली असून प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे.
भांडुपमधील अपहरण झालेल्या चिमुकलीचा मृतदेह रेल्वे रुळावर आढळला; हत्येपूर्वी नराधमाचा अत्याचार - भांडुप चिमुकलीवर अत्याचार
अकरा वर्षीय लहान मुलीचा मृतदेह विद्याविहार स्थानकाजवळील रेल्वे रुळाजवळ पोलिसांना सापडला आहे. वैद्यकीय अहवालात लैंगिक चिमुकलीवर अत्याचार करून गळा दाबल्याने तिचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. त्यानुसार भांडुप पोलिसांनी अपहरण, हत्या, बलात्कार आणि पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
हेही वाचा - जंगलपरिसरात मुलीचा संशयास्पद मृतदेह आढळला
पीडित मुलगी आपल्या भावंडांसोबत ५ नोव्हेंबरला दुपारी चर्चगल्ली येथे खेळत होती. याचदरम्यान एक अनोळखी तरुण या ठिकाणी आला. तो तिला हात पकडून दुसऱ्या ठिकाणी घेऊन गेला. बराच वेळ मुलगी बेपत्ता असल्याने कुटुंबीयांनी तिचा शोध सुरू केला. परिसरातील दुकानांमधील सीसीटीव्ही कॅमेरे तपासण्यात आले. एका कॅमेऱ्यामध्ये हा तरुण चिमुकलीला हात पकडून एलबीएस रोडच्या दिशेने जात असल्याचे दिसून आले. कुटुंबियांनी तत्काळ याबाबत तक्रार केली. तेव्हापासून पोलिस आणि कुटुंबीय तिला घेऊन जाणाऱ्याचा शोध घेत असताना विद्याविहार स्थानकानजीक रेल्वे रुळाजवळ मुलीचा मृतदेह सापडला. पोलिसांनी तिचा मृतदेह राजावाडी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला. मृतदेहाचे शवविच्छेदन तज्ञ डॉक्टरांकडून करण्यात येणार आहे. याप्रकरणी संशयित आरोपीची पोलिसांकडून कसून चौकशी केली जात आहे.