मुंबई -कोरोना काळात केलेले काम विद्यार्थ्यांच्या हृदयात खोलवर कोरले गेले असून ते आज त्यांनी काढलेल्या चित्रातून प्रतिबिंबित झाले आहे. विद्यार्थ्यांनी काढलेली ही सुंदर चित्र म्हणजे कोरोना काळात केलेल्या कामाची पोचपावती असल्याचे प्रतिपादन मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी केले.
चित्र प्रदर्शनाचे महापौरांच्या हस्ते उद्घाटन
कोरोना काळात महापौर किशोरी पेडणेकर यांनी केलेल्या उल्लेखनीय कामाबद्दल गुरूकूल स्कूल ऑफ आर्ट संस्थेच्या विद्यार्थ्यांनी काढलेल्या चित्रांचे प्रदर्शन शाॅप नं 1, वीरमहल काॅ. सोसायटी, डाॅ. आंबेडकर रोड, लालबाग, भारतमाता सिनेमासमोर येथे आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते रविवारी (दि. 15 ऑगस्ट) करण्यात आले आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांसोबत संवाद साधताना महापौर बोलत होत्या. याप्रसंगी उपमहापौर अॅड. सुहास वाडकर, गुरुकुल संस्थेचे राजन कांबळी, सागर कांबळी, गोपाल खाडये तसेच विद्यार्थी उपस्थित होते.