महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

चित्रपट दिग्दर्शकासह ९ जणांनी केला बलात्कार; मॉडेल तरुणीचा आरोप - mumbai model news

मॉडेल तरुणी काही महिन्यांपूर्वी मि-टू संदर्भात आरोप करून प्रकाशझोतात आलेली होती. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, तिने केलेल्या आरोपावरून बॉलिवुडमधील एका प्रसिद्ध फोटोग्राफर सह 9 जणांच्या विरोधात विनयभंग व बलात्काराची तक्रार दाखल करण्यात आलेली आहे.

28 वर्षीय मॉडेल आरोप
28 वर्षीय मॉडेल आरोप

By

Published : May 31, 2021, 12:46 PM IST

मुंबई- मुंबई पोलिसांच्या वांद्रा पोलिस ठाण्यामध्ये, एका 28 वर्षीय मॉडेल तरुणीने बलात्कार व विनयभंगाच्या संदर्भात 9 जणांवर आरोप करत गुन्हा दाखल केलेला आहे. मुंबईतील अंधेरी परिसरामध्ये राहणाऱ्या एका 28 वर्षीय मॉडेल तरुणीने, वांद्रा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये बॉलिवूडमधील काही टॅलेंट मॅनेजर , चित्रपट दिग्दर्शक यांच्यासह एका मोठ्या निर्मात्याच्या मुलांचाही समावेश असल्याचं समोर आलेल आहे.

mumbai model rape case

बॉलिवूडमधील टॅलेंट मॅनेजर, चित्रपट दिग्दर्शक यांचा समावेश

सदरची तक्रार दाखल करणारी मॉडेल तरुणी काही महिन्यांपूर्वी मि-टू संदर्भात आरोप करून प्रकाशझोतात आलेली होती. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, बॉलिवुडमधील एका प्रसिद्ध फोटोग्राफर सह 9 जणांच्या विरोधात विनयभंग व बलात्काराची तक्रार दाखल करण्यात आलेली आहे. सदरच्या पिडित मॉडेल तरुणीने 12 एप्रिल रोजी तिच्या सोशल माध्यमांवरील अकाउंट वर तिच्या संदर्भात घडलेल्या घटनांबद्दल पोस्ट केली होती. यानंतर मुंबई पोलिसांच्या वांद्रा पोलिसांकडून 26 मे रोजी या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

हेही वाचा-मुंबईतील अँटॉप हिल परिसरात 31 वर्षीय तरुणाचा खून

ABOUT THE AUTHOR

...view details