मुंबई- राज्यात सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढतोय. खास करून महानगरांमध्ये हा आकडा उच्चांक गाठताना दिसतोय. त्यातच दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा तोंडावर आलेल्या आहेत. त्यामुळे या परीक्षा होणार की नाही? नेमकं कोरोनाच्या सावटाखाली या परीक्षेत प्रयोजन कसे असेल? या संदर्भात सर्व पालकांच्या मनात चिंता आहेत. मात्र कोरोनाचे सर्व नियम पाळत विद्यार्थ्यांच्या सुरक्षा अग्रस्थानी ठेऊन शिक्षण विभागाकडून तयारी केली असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.
दहावी बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा या ठरलेल्या वेळापत्रकानुसारच होणार आहेत. तर परीक्षा करण्यासाठीचे सर्व नियोजन केले असून विद्यार्थ्यांची सुरक्षा प्राथमिक असल्याची माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली. त्यामुळे पालकाने कोणतीही चिंता करण्याची गरज नाही, सुरक्षित वातावरणात या परीक्षा घेतल्या जाणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.
दहावी बारावीच्या परीक्षा ठरलेल्या वेळापत्रकाप्रमाणेच होणार, शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती.. परीक्षा न देता आलेल्या विद्यार्थ्यांना जूनमध्ये संधी - दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा तोंडावर आहेत. त्यामुळे कोरोना संसर्गामुळे परीक्षा असताना विद्यार्थी कंटेम्मेंट झोन मध्ये राहत असल्यास किव्हा परिसरात लॉक डाऊन असल्यास त्या विद्यार्थ्याला परीक्षा देता आली नाही तर, जून महिन्यात पुन्हा एकदा दहावी आणि बारावीच्या परीक्षा घेतल्या जाणार आहेत. त्या परीक्षेत ज्या विद्यार्थ्यांना परीक्षा देता आल्या नाहीत त्या सर्व विद्यार्थ्यांना जूनमध्ये होणाऱ्या परीक्षेत बसता येणार आहे. मात्र ज्या विद्यार्थ्यांची परीक्षा कोरोनामुळे देता येणार नाही, अशा विद्यार्थ्यांच्या शाळेने ती माहिती संबंधित अधिकारी किंवा प्रशासनाला देणे गरजेचे आहे. त्यानंतरच त्या विद्यार्थ्यांना जूनमध्ये होणाऱ्या परीक्षेसाठी पात्र ठरवले जाणार आहे.
हेही वाचा -राज्यातील कृषी विद्यापीठांची 'लॉकडाऊन'मध्ये प्रवेश प्रक्रिया; होतकरू विद्यार्थ्यांचे होणार नुकसान