मुंबई: विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह महाविकास आघाडीच्या सात सदस्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात हक्कभंग प्रस्ताव विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांच्याकडे मांडला होता. मुख्यमंत्र्यांवर फक्त भंग लागू करावा, अशी मागणी लावून धरली होती. नीलम गोऱ्हे यांनी तो राखून ठेवत, मुख्यमंत्री सभागृहात असताना हा मुद्दा चर्चेला जाईल, असे स्पष्ट केले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सभागृहात आल्यानंतर सभापती गोरे यांनी, आघाडीच्या 289 प्रस्तावावर खुलासा करण्याची सूचना केली. मुख्यमंत्र्यांच्या स्पष्टीकरणाला ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी विरोध केला. प्रकरण हक्कभंग समितीकडे गेले असून त्यांनी तिकडे खुलासा करावा, असे सांगितले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभापतींच्या अधिकाराचे हणन करू नका, असे आवाहन केले.
यामुळे नवाब मलिक कोठडीत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावर स्पष्टीकरण दिले. विरोधी पक्ष नेत्यांना मी देशद्रोही म्हटलेलो नाही. प्रसार माध्यमात त्याबाबत व्हिडिओ आहेत. मात्र, ज्यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत, ते माजी मंत्री नवाब मलिक यांना मी देशद्रोही म्हटल्याचा खुलासा मुख्यमंत्र्यांनी केला. मलिक यांचे देशद्रोही दाऊद इब्राहिम आणि त्याचबरोबर इतर असलेले इब्राहिम शेख, छोटा शकील, जावेद चिकना, टायगर मेमन, इकबाल मिरची, हसीना पारकर व्यावहारिक यांच्याशी संबंध आहेत. या सर्व लोकांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झालेला आहे. त्यांच्याशी संबंधित असलेल्या फैजल अब्बास आणि त्याची मुलगी मुनायला यांच्या वारसाकडून जमिनीचे आर्थिक व्यवहार केले आहेत. मुंबईतील बॉम्बस्फोटात ज्यांना शिक्षा झाली, त्या देशद्रोह्यांशी आर्थिक संबंध ठेवल्याप्रकरणी मलिक कोठडीत आहेत, असे मुख्यमंत्री म्हणाले.
CM Shinde On Traitor Statement: 'ते' विधान नवाब मलिकांसाठी; 'देशद्रोही' या विधानावर मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण... - CM Shinde on Nawab Malik
महाविकास आघाडीतील नेत्यांची तुलना देशद्रोह्यांशी केल्या प्रकरणावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेत आज खुलासा केला. माझे विधान विरोधी पक्ष नेत्यांना नव्हे तर नवाब मलिक यांच्यासाठी होते. देशद्रोह्यांना तुम्ही पाठीशी घालणार असाल तर मी एकदा नव्हे ५० वेळा करेन. देशद्रोही म्हणण्याचा गुन्हा करेन अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना ठणकावले.
मुख्यमंत्री शिंदेंचा खुलासा: मुंबई झालेल्या बॉम्बस्फोटात हजारो शेकडो निरपराध लोकं मृत्युमुखी पडली. नवाब मलिक यांच्याशी संबंध उघडकीस आल्यानंतर त्यांना जेलमध्ये जावे लागले. आघाडी सरकारच्या काळात ते जेलमध्ये जाऊनही राजीनामा घेतला गेला नाही. तत्कालीन मुख्यमंत्र्यांची इच्छा असतानाही त्यांना पाठीशी घालण्यात आले. अशा सरकार सोबत आम्ही बसणार नाही, अशी भूमिका घेतली. आजही त्या भूमिकेवर मी ठाम आहे. मी मलिक यांना देशद्रोही म्हटले, अजित पवार किंवा अंबादास दानवे यांना देशद्रोही म्हटलेले नाही, असा खुलासा मुख्यमंत्री शिंदे यांनी सभागृहात केला.
तर पन्नास वेळा गुन्हा करेल: विरोधी पक्षनेते अजित दादा पवार यांनी आमची तुलना महाराष्ट्र द्रोह्यांशी केली. आम्ही महाराष्ट्र द्रोही कसे.? असा प्रश्न मुख्यमंत्री आणि उपस्थित केला. 2019 मध्ये स्थापन झालेले महाविकास आघाडीचे सरकार लोकांच्या मनाविरोधात होते. परंतु, ज्यावेळी मलिक यांना जेलमध्ये जावे लागले, पुरावे असताना त्यांचा राजीनामा घेतला गेला नाही. देशद्रोह्यांना पाठीशी घालण्याचे काम झाले. विरोधकांकडे मात्र याला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न झाला. दाऊदने मुंबईमध्ये अनेक वेळा बॉम्बस्फोट घडवले. त्याच्या बरोबर त्याच्या बहिणीबरोबर ज्यांचे आर्थिक व्यवहार ठेवणाऱ्या खऱ्या अर्थाने दहशतवादाला खतपाणी घालणे, पैसा पुरवणे या सगळ्या गोष्टी त्यात नमूद आहेत. अशा माणसाला मी देशद्रोही म्हणालो. विरोधक देशद्रोह्याला समर्थन देणार का? असा सवाल उपस्थित करत, देशद्रोह्यांला देशद्रोही म्हणून हा गुन्हा असेल तर एकदा नव्हे तर पन्नास वेळा करेल, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले.