महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Bullet Train Tender: बुलेट ट्रेन मार्गासाठी ठाणे डेपोच्या निविदा 'या' तारखेला उघडणार - depo tender will be opened on 15 March

मुंबईत वांद्रे कुर्ला संकुल या ठिकाणी बुलेट ट्रेनचे रेल्वे स्थानक केले जाणार आहे. त्याला पॅकेज सी वन असे म्हटले गेलेले आहे. या संदर्भातली आर्थिक बाबीची बोली 28 डिसेंबर 2022 रोजी उघडण्यात आली होती. बुलेट ट्रेन मार्गासाठी ठाणे डेपोच्या निविदा 15 मार्च 2023 रोजी खुल्या होणार आहेत.

Bullet Train Tender
बुलेट ट्रेन मार्ग

By

Published : Feb 10, 2023, 1:34 PM IST

मुंबई :बुलेट ट्रेनच्या भुयारी मार्गामध्ये किंवा रेल्वे स्थानकाच्या ठिकाणी अनेक ठिकाणी पूल, बोगदे देखभाल कामे होणार आहे. त्यासाठी डेपोचा समावेश असलेली नागरी कामांसाठी इमारत असणार आहे. यामध्ये एकूण तीन इमारती उभ्या केल्या जाणार आहे. तसेच जे जे रेल्वे स्थानकाचे ठिकाण आहे, त्यामध्ये वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स यासोबत ठाणे आहे. त्यानंतर विरार व तसेच बोईसर आणि गुजरात व महाराष्ट्राच्या सीमेलगत शिळफाटा आणि जरोली गावाच्या दरम्यान ठाणे जिल्ह्यात डेपोसाठी जोडणीची कामे केली जाणार आहे. हे अंतर जवळजवळ 135 किलोमीटर आहे. जे पॅकेज सी तीनमध्ये होणार आहे. याची निविदा 15 नोव्हेंबर 2022 रोजी मागवण्यात आली होती.



निविदा 15 मार्चला खुली होणार : वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स या ठिकाणी बुलेट ट्रेनचे रेल्वे स्थानक जे होणार आहे. तिथून ते ठाणे जिल्ह्यातील शिळफाटा पर्यंतचे पॅकेज सी टू असे त्याला म्हटले जाते. या ठिकाणी ठाणे जिल्ह्यात ठाणे बुलेट ट्रेन डेपोचे जे रेल्वे स्थानक होणार आहे, त्या ठिकाणी डिझाईन आणि बांधकाम तसेच सिविल वर्क बिल्डिंग वर्क इन्फेक्शन इन्स्पेक्शन वर्क या संदर्भातील निविदा 15 मार्च 2023 रोजी खुली केली जाणार आहे. तर 26 एप्रिल 2023 रोजी ठाणे जिल्ह्यातील या डेपोच्या संदर्भातील आणि त्याला अनुषंगून इन्स्टॉलेशन, चाचणी, देखभाल सुविधा इतर कामे अशा सर्व बाबींची निविदा 26 एप्रिल 2023 रोजी उघडण्याचे निश्चित केलेले आहे.


गुजरात महाराष्ट्र रेल्वे मार्ग :मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठीचा जो मार्ग आहे, या मार्गाची एकूण 508 किमी एकूण लांबी आहे. महाराष्ट्रामध्ये त्यापैकी 156 किलोमीटर आहे. फक्त चार किलोमीटर मार्ग दादरा नगर हवेली या केंद्रशासित राज्यातून जाणार आहे. तर 348 किलोमीटर मार्ग हा गुजरातमधून जाणार आहे. बुलेट ट्रेनची गती तासाला 320 किलोमीटर इतकी असणार आहे. त्यामुळे मुंबई ते अहमदाबाद, असा जाणारा येणारा वेळ दोन तास सात मिनिटे असा आहे. जे मर्यादित थांबे म्हणजे रेल्वे स्थानक जे आहेत, त्या ठिकाणी थांबून एकूण वेळ दोन तास 58 मिनिटे एवढा वेळ लागणार आहे.


रेल्वे स्थानक अशी :मुंबई ते अहमदाबाद या बुलेट ट्रेन रेल्वे मार्गामध्ये एकूण बारा स्थानके आहेत. त्यापैकी चार रेल्वे स्थानक महाराष्ट्र राज्यात, तर चार रेल्वे स्थानके गुजरात राज्यामध्ये होणार आहेत. मुंबईमध्ये वांद्रे कुर्ला संकुल येथे मोठे रेल्वे स्थानक असणार आहे. त्यानंतर ठाणे नंतर विरार आणि बोईसर या ठिकाणी रेल्वे स्थानक उभारली जाणार आहेत. त्यानंतर गुजरातमध्ये वापी बिल्लीमोरा आणि सुरत तसेच भरूच, वडोदरा, आनंद नडियाद, अहमदाबादमध्ये असणार आहे.

गुजरातमध्ये महाराष्ट्रात चार डेपो :गुजरातमध्ये एकूण तीन डेपो बुलेट ट्रेनचे उभारली जाणार आहेत. महाराष्ट्रामध्ये एक ठिकाणी जे ठाणे येथे असेल, ते डेपो म्हणून उभारले जाणार आहे. साबरमती या ठिकाणी ऑपरेशनल कंट्रोल सेंटर उभारले जाणार आहे. संपूर्ण या बुलेट ट्रेनच्या मार्गाबाबतचे ऑपरेशन म्हणजे, संपूर्ण चलन वलन त्याचे नियमन साबरमती या डेपोमधून केले जाणार आहे. अशा पद्धतीने डेपो उभारले जाणार आहे.



प्रकल्पाची सद्यस्थिती :महाराष्ट्रामध्ये भूसंपादनाची एकूण स्थिती 98.79 टक्के आहे. तर दादरा नगर हवेली या केंद्रशासित राज्यात 100 टक्के भूसंपादन झालेले आहे. गुजरात या राज्यात भूसंपादनाची स्थिती 98.91 टक्के आहे. दोन्ही राज्यातील भूसंपादनाची स्थिती सध्या 98.88 टक्के इतकी आहे. गुजरात आणि दादरा नगर हवेली संपूर्ण कामासाठी सिव्हिल कार्य पूल आणि ट्रॅकसाठी 100 टक्के काम झालेले आहे. तसेच पूल स्टेशन ट्रॅक इत्यादी बांधकामासाठी 352 किलोमीटरचे कंत्राट राष्ट्रीय गतिशक्ती रेल्वे महामंडळाकडून देण्यात आलेले आहे.

हेही वाचा : PM Narendra Modi Mumbai Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदींचा असा असणार आज मुंबईचा दौरा, जाणून घ्या सविस्तर

ABOUT THE AUTHOR

...view details