मुंबई: हिवाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार करण्याचा राज्य सरकारचा विचार सुरू आहे. (Maharashtra Cabinet expansion). मुंबई शहराला नवीन पालकमंत्री देण्यात येणार असून दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांना या जबाबदारीतून मुक्त केले जाणार आहे. (mumbai guardian minister). सदा सरवणकर (Sada Sarvankar) यांचे नाव यासाठी निश्चित मानले जात आहे, तर भाजपाचे मंगल प्रभात लोढा (Mangal Prabhat Lodha) यांच्याकडे मुंबई उपनगराचे पालकमंत्री पद कायम राहणार आहे अशी माहिती शिंदे गटातील एका उच्च पदस्थ नेत्यांनी दिली आहे. मात्र यात महत्त्वाची बाब म्हणजे मुंबई शहर जिल्हा करिता नवा पालकमंत्री निश्चित करण्यात आला आहे, अशी माहिती असून या निमित्ताने सदा सरवणकर यांना मंत्रीपदाची संधी देण्यात येणार आहे हे सुद्धा निश्चित झाले
Maharashtra Cabinet expansion: मंत्रीमंडळाच्या विस्तारात हे होणार मुंबई, ठाण्याचे किल्लेदार - मंत्रीमंडळाच्या विस्तारात
मंत्रिमंडळ विस्ताराला हिरवा कंदील मिळाला असून (Maharashtra Cabinet expansion) अधिवेशनापूर्वी याबाबत सरकारकडून निर्णय घेतला जाण्याची शक्यता शिंदे गटाच्या उच्चपदस्थ नेत्याने व्यक्त केली आहे. मात्र ठाणे आणि मुंबई या दोन महत्त्वाच्या जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी कोणाकडे येणार याबाबत चर्चांना उधाण आले आहे. (thane guardian minister) (mumbai guardian minister).
![Maharashtra Cabinet expansion: मंत्रीमंडळाच्या विस्तारात हे होणार मुंबई, ठाण्याचे किल्लेदार thane and mumbai guardian minister](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-16879298-thumbnail-3x2-guardianminister.jpg)
कोण होणार ठाणेदार? :ठाणे जिल्हा हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मतदार संघ असलेला जिल्हा आहे. ठाणे जिल्ह्याला पालकमंत्री कोण मिळणार याबाबत चर्चांना उधाण आले असून मुख्यमंत्र्यांच्या ठाणे जिल्ह्याची जबाबदारी कोणाकडे सोपवली जाणार याबाबत चर्चा सुरू आहे. (thane guardian minister). शंभूराज देसाई यांच्याकडे सध्या सातारा आणि ठाणे जिल्ह्याची जबाबदारी आहे. मात्र मंत्रिमंडळ विस्तारानंतर त्यांच्याकडचा अतिरिक्त भार काढला जाणार असून ठाण्याच्या पालकमंत्री पदासाठी आमदार प्रताप सरनाईक उत्सुक आहेत. मात्र त्यांच्याबाबत समाजात असलेली प्रतिमा, त्यांच्यावर असलेले भ्रष्टाचाराचे आरोप आणि ईडी कारवाईचा त्यांच्यावर असलेला बडगा याचा विचार करता त्यांच्या मंत्रिमंडळातील समावेशाबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे, असेही शिंदे गटाच्या बड्या नेत्यांनी सांगितले. सरनाईक यांच्याकडे कारभार सोपवण्यास मुख्यमंत्री शिंदे इच्छुक नाहीत, त्यामुळे नवीन अन्य पर्यायांची चाचपणी सुरू आहे असेही त्यांनी सांगितले
ठाण्यासाठी विविध पर्यायांची चाचपणीवास्तविक ठाणे जिल्ह्यात भाजपचे सर्वाधिक आठ आमदार आहेत. मात्र असे असूनही पालकमंत्री पदाची जबाबदारी रवींद्र चव्हाण यांच्याकडे सोपवता ती शिंदे गटाच्या आमदाराकडे द्यावी यासाठी मुख्यमंत्री आग्रही असल्याने उपमुख्यमंत्री फडणवीस यांना आपला हट्ट सोडावा लागला आहे. ठाण्यात शिवसेनेचे पाच आमदार आहेत त्यामुळे प्रताप सरनाईक वगळता अन्य कोणत्या आमदारांकडे ठाण्याची जबाबदारी देता येईल का? याबाबत चर्चा सुरू असून अंबरनाथचे आमदार बालाजी तिनी कर यांचे नाव आघाडीवर आहे किनीकर यांना मंत्रिमंडळात स्थान दिल्यास आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका शिंदे गटाला बळ मिळेल आणि श्रीकांत शिंदे यांचा लोकसभेचा मार्गही अधिक सोपा होईल त्यामुळे डॉक्टर बालाजी कीणीकर यांचे नाव निश्चित होण्याची शक्यता मानली जात आहे.