मुंबई :मोहित कंबोजने ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांच्यावर केलेल्या आरोपांवर प्रतिक्रिया देताना ते माध्यमांशी बोलत होते. तेव्हा भास्कर जाधव म्हणाले,सरकारने सुसंस्कृत राजकारण करायला हवे. मी एकमेकांचा आदर करत आहे. परंतु मागील काही दिवस देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एक सुसंस्कृत राजकारणी म्हणून बघितले जाते. परंतु ती परिस्थिती आता राहिली नाही आहे. ज्यांच्यावर आरोप होतात, त्यांनी हे बघायला पाहिजे. २२ जूनला एकनाथ शिंदे यांना पक्षात घ्या, असे सांगितले होते. ४० आमदारांना घेऊन भास्कर जाधव गोहाटीला गेले, त्या सर्वांना फोन केले. असे आरोप कंबोज यांनी भास्कर जाधव यांच्यावर केले होते.
एक तरी आरोप सिद्ध करून दाखवावा :यावर बोलताना भास्कर जाधव म्हणाले की, मी एकनाथ शिंदे यांना १०० फोन केले. जोपर्यंत मला पक्षात घेत नाही, तोपर्यंत मी गोहाटी सोडणार नाही असे सांगितले, असा आरोप मोहित कंबोज यांनी माझ्यावर केला आहे. त्यावर मी मोहित कंबोज यांना इतकेच सांगू इच्छितो की, मोहित कंबोज यांनी एक तरी आरोप सिद्ध करून दाखवावा. तुमच्याकडे सर्व काही यंत्रणा आहे. मी आजपर्यंत अनेक पक्षात गेलो. पण कधीच लाचारी पत्करली नाही, असे सांगत भास्कर जाधव यांनी मोहित कंबोजसहित उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा एक प्रकारे इशारा दिला आहे.