महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Kirit Somaiya PC : ठाकरे सरकारने स्वतः नेमलेल्या मेट्रो कारशेड समितीचा अहवाल दाबला का? किरीट सोमय्या यांचा प्रश्न - मुंबई मेट्रो कारशेड

मेट्रो कारशेडसाठी (Mumbai Metro Carshed) नेमण्यात आलेल्या मनोज सौनिक समितीचा (Manoj Saunik Committee Report) मुंबईच्या मेट्रो रेल्वे, आरे कारशेड वरील अहवाल ठाकरे सरकारनी लपवला का? असा प्रश्न भाजपा नेते किरीट सोमैया (BJP leader Kirit Somaiya allegation on Uddhav Thackeray) यांनी केला आहे. आरे येथील कारशेडचा प्रकल्प रद्द करण्याचा आदेश दिला व मनोज सौनिक यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली ज्यांनी आपला अहवाल २ आठवड्यात व नंतर मुदत वाढून ३ महिन्यात देण्याचे आदेश तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले होते. Latest news from Mumbai, Kirit Somaiya PC

Kirit Somaiya PC
किरीट सोमय्या

By

Published : Nov 28, 2022, 7:54 PM IST

मुंबई : २८ नोव्हेंबर २०२२ मेट्रो कारशेडसाठी (Mumbai Metro Carshed) नेमण्यात आलेल्या मनोज सौनिक समितीचा (Manoj Saunik Committee Report) मुंबईच्या मेट्रो रेल्वे, आरे कारशेड वरील अहवाल ठाकरे सरकारनी लपवला का? असा प्रश्न भाजपा नेते किरीट सोमैया (BJP leader Kirit Somaiya allegation on Uddhav Thackeray) यांनी केला आहे. मुंबईत भाजप प्रदेश कार्यालयात ते बोलत होते. विशेष म्हणजे, या समितीचे गठण स्वतः तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले होते. Latest news from Mumbai, Kirit Somaiya PC

मेट्रो कारशेड समितीचा अहवालावर किरीट सोमय्या यांचा घणाघात

काय म्हणाले सोमय्या?
याप्रसंगी बोलताना किरीट सोमय्या म्हणाले की,मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी २८ नोव्हेंबर २०१९ रोजी शपथ घेतली. २९ नोव्हेंबरला मुंबईची नवीन लाईफलाईन मेट्रोचे काम थांबवण्याचे आदेश ठाकरे सरकारने दिले. आरे येथील कारशेडचा प्रकल्प रद्द करण्याचा आदेश दिला व मनोज सौनिक यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली ज्यांनी आपला अहवाल २ आठवड्यात व नंतर मुदत वाढून ३ महिन्यात देण्याचे आदेश तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले होते. मनोज सौनिक समितीची रचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली होती. समितीचे सदस्य मुख्यमंत्री यांनी स्वतः निवडले होते. समितीने १५ दिवसात व नंतर लांबून ३ महिन्यात अहवाल देण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जी यांनी दिले होते. समितीने आपला अहवाल पण दिला होता. त्यानंतर या समितीचा रिपोर्ट दाबण्याचे खरे कारण काय? असा प्रश्न सोमय्या यांनी उपस्थित केला आहे.

काय आहे रिपोर्टमध्ये?
मनोज सौनिक समिती यांनी या पूर्ण प्रकल्प, आरे कारशेड व अन्य १० जागांचा अभ्यास केला व आपल्या अहवालात त्यांनी स्पष्टपणे म्हटले की अशा प्रकाराने कोणतेही प्रकल्प थांबवणे, आरे कारशेडच्या कामाला रद्द करणे हे योग्य नाही., कायदेशीर नाही, व्यवहार्य नाही. आपल्या अहवालाची सांगता करताना मनोज सौनिक समितीने स्पष्टपणे म्हटले आहे की, ही समिती राज्य सरकारला सूचित करू इच्छिते की, मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन लि. (MMRCL) ला आरे कारशेडचे काम पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात यावे. हे काम गतीने पूर्ण करण्यात यावे. आरे कारशेड येथेच मेट्रो लाईन ३ चा डेपो व्हायला हवा, आरे कारशेड व मेट्रो-३ चे काम गतीने पूर्ण व्हावे, अशी सूचना ही मनोज सौनिक समितीने केली.

ABOUT THE AUTHOR

...view details