मुंबई -अभिनेतासुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणांत रियाच्या अटकेनंतर ठाकरे सरकारला भीती वाटत असेल, अशी टीका भाजपा नेते किरीट सोमैया यांनी केली आहे. तसेच या प्रकरणाची चौकशी सीबीआयने लगेच केल्यामुळे गृहमंत्री यांनी राजीनामा द्यावा आणि मुंबई पोलीस आयुक्तांना घरी पाठवावे, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
सुशांतसिंह प्रकरण : रियाच्या अटकेनंतर ठाकरे सरकारला भीती वाटत असेल - kirit somaiya criticize maha gov
सुशांतसिंह प्रकरणात ड्रग्स प्रकरण वळण घेताच त्याची एनसीबीने तपास करताना आज दोन दिवसाच्या चौकशीनंतर रिया चक्रवर्तीला एनसीबी अटक केली. अमली पदार्थविरोधी पथकाने चौकशी करत असताना रिया आणि सुशांत तसेच शोविक हे ड्रग्स घेत होते, अशी माहिती समोर आली आहे.
सुशांतसिंह प्रकरणात ड्रग्स प्रकरण वळण घेताच त्याची एनसीबीने तपास करताना आज दोन दिवसाच्या चौकशीनंतर रिया चक्रवर्तीला एनसीबी अटक केली. अमली पदार्थविरोधी पथकाने चौकशी करत असताना रिया आणि सुशांत तसेच शोविक हे ड्रग्स घेत होते, अशी माहिती समोर आली आहे. यामध्ये सुरुवातीपासूनच विरोधी पक्ष भाजपाने या प्रकरणात महाराष्ट्रातील मंत्र्यांचाही हात आहे, असा आरोप केला होता. त्यानंतर आज (मंगळवारी) रियाला अटक झाल्यानंतर आता महाराष्ट्र सरकारमधील मंत्र्यांना भीती वाटत असेल, अशी टिकाही भाजपा नेते किरीट सोमैया यांनी केली.
सोमैया म्हणाले, आज रियाला अटक झाली. त्यामुळे ठाकरे सरकारला आता भीती वाटत असेल. कोणाची चौकशी होणार आणि कोणाची अटक होईल, ठाकरे सरकारने हे प्रकरण साठ दिवस दाबून ठेवले. मात्र, सीबीआयने दोन आठवड्यात याचा तपास करत सुशांतसिंह प्रकरण चौकशी काय असते, ते दाखवून दिले. त्यामुळे महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांची ताबडतोब हकालपट्टी करावी आणि मुंबई पोलीस आयुक्त यांनाही घरी पाठवावे, अशी मागणी किरीट सोमैया यांनी केली आहे.