मुंबई - शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने याची माहिती दिली आहे. ८ नोव्हेंबरपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात आले आहेत.
हेही वाचा -काँग्रेस, राष्ट्रवादीची बैठक रद्द, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
२०१३ पासून टीईटीची परीक्षा राज्यात घेण्यात येते. शिक्षकपदी नियुक्ती होण्यासाठी ही परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. यासाठी २८ नोव्हेंबरला अर्ज भरण्याची शेवटची मुदत आहे. mahatet.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज भरण्यात येतील. शिक्षक पात्रता परीक्षेचे दोन पेपर घेण्यात येतील. दोन्ही पेपर १९ जानेवारी २०२० रोजी घेण्यात येतील.
हेही वाचा -'बाजार समित्या बरखास्तीचा निर्णय म्हणजे शेतकऱ्यांच्या गळ्यात फास'
ही परीक्षा एकूण २०० गुणांची असेल. यात उत्तीर्ण होण्यासाठी किमान ६० गुणांची आवश्यकता आहे. दोन्ही प्रश्नपत्रिकांची काठीण्य पातळी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शालेय अभ्यासक्रमावर आधारीत असेल. पहिली ते पाचवीच्या वर्गांना शिकवण्यासाठी पहिला पेपर, तर सहावी ते आठवीच्या वर्गांना शिकवण्यासाठी दुसरा पेपर उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.