महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुंबईवर पुन्हा 26/11 सारखा हल्ल्याचा प्रयत्न, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा गौप्यस्फोट - राजनाथ सिंह

मुंबईवर पुन्हा 26/11 सारखा हल्ला  करण्याचा प्रयत्न दहशतवादी करत आहेत, असे आज राजनाथ सिंह म्हणाले आहेत.

संरक्षण मंत्री  राजनाथ सिंह

By

Published : Sep 28, 2019, 10:31 AM IST

Updated : Sep 28, 2019, 12:17 PM IST

मुंबई -मुंबईवर पुन्हा 26/11 सारखा हल्ला करण्याचा प्रयत्न दहशतवादी करत आहेत. मात्र त्यांना रोखण्यात आम्ही सक्षम आहोत. त्यांच्या कोणत्याच प्रयत्नांना आम्ही यश मिळू देणार नाही असे आज संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले आहेत. खांदेरी पाणबूडीच्या उद्घाटनावेळी ते बोलत होते.


जम्मू काश्मीरमधील कलम 370 रद्द केला असून आम्हाला जनतेचा सपोर्ट मिळाला आहे. मात्र पाकिस्तानचे पंतप्रधान दारोदारी भटकत आहेत. आम्ही शेजाऱ्यासोबत शांती प्रस्थापित करण्यात विश्वास ठेवतो. 'आयएनएस खांदेरी' नौदलात सामिल झाल्यामुळे नौदलाची शक्ती वाढली आहे. आता पाकिस्तानला पहिल्यापेक्षा मोठा दणका येता येईल, असे ते म्हणाले.


आयएनएस खंडेरीची निर्मिती शिवाजी महाराज यांच्या परिसरात होत आहे. महाराजांचे स्वप्न मोठे होते. हिंदी महासागरात भारत ब्लु वॉटर नेवि म्हणून ओळखली जाणार आहे.


'आयएनएस खांदेरी' ही अत्याधुनिक पाणबुडी -
'आयएनएस खांदेरी' ही पाणबूडी 67 मीटर लांब व बारा मीटर उंच आहे. पाण्याखाली 350 मीटर खोल ही पाणबुडी जाऊ शकते. तर समुद्रात सलग 6500 नोटिकल्स माईल्स म्हणजेच 12 हजार किलोमीटर चा प्रवास ही पाणबुडी करू शकते. 1565 टन वजन असलेली ह्या पाणबुडीत 11 किलोमीटर लांबीची पाईपलाईन करण्यात आली आहे. 60 किलोमीटर लांब केबल फिटिंग या पाणबुडीत करण्यात आली आहे.

Last Updated : Sep 28, 2019, 12:17 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details