मुंबई - डोंगरी परिसरात रस्त्यावर उभ्या असलेल्या एका युवकावर ३ जणाच्या टोळक्याने तलवारीने हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. मुंबईसारख्या शहरात रस्त्यावर तलवारी घेऊन मारहाण करत असल्याचा व्हिडिओ सोशल माध्यमांवर व्हायरल झाला असून पोलिसांनी या बाबतीत आरोपींचा तपास सुरू केला आहे.
मुंबईतील डोंगरी परिसरात गुंडांचा हातात तलवारी घेऊन हैदोस - फरार
एका युवकावर ३ जणाच्या टोळक्याने तलवारीने हल्ला केल्याची घटना समोर आली आहे.
शनिवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास अबू शेख हा युवक डोंगरी परिसरात आपल्या मित्रांसोबत गप्पा मारत थांबला होता. तेव्हा त्याचे नईम काल्या या स्थानिक गुंडाशी शाब्दिक चकमक होऊन याचे रुपातंर हाणामारीत झाले. त्यानंतर गुंड नईम काल्या याने त्याच्या इतर २ साथीदारांसोबत हातात तलवारी व काठ्या घेऊन पीडित अबू शेख या युवकाला जबर मारहाण केली.
ही मारहाण होत असताना एका स्थानिकाने याचा मोबाईल व्हिडिओ बनवला. त्यानंतर त्याने तो व्हिडिओ सोशल माध्यमात मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला. तेव्हा याची नोंद घेत पायधुनी पोलिसांनी गुन्हा दाखल करुन या गुन्ह्यातील आरोपींचा शोध सुरू केला आहे.