महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Mumbai Terror Attack: मुंबईवर दहशतवादी हल्ला करण्याचा एनआयएला धमकीचा मेल, मुंबई पोलिसांना दिली माहिती

मुंबईत दहशतवादी हल्ल्याचा एनआयए या राष्ट्रीय तपास यंत्रणेला ई-मेल आल्याने खळबळ उडाली आहे. धमकीच्या ईमेलच्या पार्श्वभूमीवर देशातील विविध शहरांना एनआयएकडून अलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान, याबाबत मुंबई पोलीस, एनआयए आणि इतर यंत्रणा याबाबत सखोल तपास करत असल्याची माहिती मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी दिली आहे.

Mumbai Terror Attack
मुंबईवर दहशतवादी हल्ला

By

Published : Feb 3, 2023, 11:19 AM IST

Updated : Feb 3, 2023, 5:12 PM IST

मुंबई : ई-मेल करणाऱ्याचा तालिबानी असल्याचा दावा करण्यात आला आहे. याबाबत एनआयएने मुंबई पोलिसांना माहिती दिली आहे. तालिबानी नेता हक्कानीच्या आदेशानुसार ई-मेल पाठवण्यात आले असल्याची माहिती एनआयएच्या सूत्रांनी दिली आहे. काही दिवसांपूर्वी २६/११ सारखा हल्ला पुन्हा करू अशी धमकी देणारा फोन मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रूममध्ये आला होता. असाच फोन पुन्हा एकदा आला होता. यावेळी हाजीअली दर्ग्यावर दहशतवादी हल्ला करण्याची धमकी दिल्याने खळबळ उडाली होती. हा फोन उल्हासनगर येथून आल्याची माहिती मिळत असून मुंबई पोलिसांनी या फोनचा माग काढला होता.

दर्ग्यावर हल्ला करण्याची धमकी: मुंबई पोलिसांना काही दिवसांपूर्वी २६/११ सारखा हल्ला करू असा धमकी वजा फोन आलेला होता. यानंतर अंबानी यांना मारण्याची धमकी देण्यात आली होती. त्यावेळी धमकी देणाऱ्यांनी मुंबईतील प्रसिद्ध हाजीअली दर्ग्यावर दहशतवादी हल्ला करण्याची धमकी दिली होती. हा फोन येताच पोलिस अ‍ॅक्टिव झाले आणि कंट्रोल रूममधून आदेश मिळताच बीडीडीएस, कॉन्वेंट वेनलाही पाचारण करण्यात आले होते. पोलिसांनी हाजी अली दर्ग्याच्या आजूबाजूचा परिसर पिंजून काढला होता.

मेलवर दिली धमकी :धमकी देणाऱ्यांनी दोन वेळा फोन केल्याची माहिती मिळाली होती. या फोन वर पुन्हा फोन केला असता तो बंद लागला होता. दरम्यान पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, धमकीचा फोन करणारी व्यक्ती मानसिक रुग्ण असून तिच्यावर उपचार सुरु आहे, अशी माहिती समोर आली होती. यावेळी देखील एनआयएला आलेल्या धमकीच्या मेल नंतर मुंबई पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, त्यांना कुठेही अज्ञात संशयास्पद वस्तू आढळल्यास त्यांनी याबाबत मुंबई पोलिसांना माहिती द्यावी.

मुंबई पोलिसांचे नागरिकांना आवाहन - राष्ट्रीय तपास यंत्रणा म्हणजेच एनआयएला आलेल्या धमकीच्या इमेल नंतर मुंबई पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे. कुठेही अज्ञात संशयास्पद वस्तू आढळल्यास त्यांनी याबाबत मुंबई पोलिसांना माहिती द्यावी, असे पोलिसांनी म्हटले आहे. गेल्या वर्षी मुंबईत अनेक ठिकाणी हल्ल्याची धमकी देण्यात आली होती. त्यात काही वेळेस फोन तर काही वेळेस ईमेलचा वापर करण्यात आला आहे. पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

हेही वाचा:Terrorist Granade Attack जम्मूकाश्मीर राजौरीमध्ये दुसरा दहशतवादी हल्ला एका मुलाचा मृत्यू 5 जखमी

Last Updated : Feb 3, 2023, 5:12 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details