महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

प्रवासी नसल्याने राज्यांतर्गत धावणाऱ्या 10 रेल्वे गाड्या रद्द

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्य शासनाकडून राज्यात कडक निर्बंध जाहीर करण्यात आले आहे. त्याचा फटका रेल्वे प्रशासनाला बसला असून मध्य रेल्वे मार्गावरील राज्यांतर्गत प्रवासी संख्या कमी झाली आहे. कमी प्रतिसादामुळे, प्रवासी संख्या अत्यल्प असल्याने मध्य रेल्वेने अनेक गाड्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

रेल्वे
रेल्वे

By

Published : Apr 26, 2021, 10:05 PM IST

मुंबई -कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्य शासनाकडून राज्यात कडक निर्बंध जाहीर करण्यात आले आहे. त्याचा फटका रेल्वे प्रशासनाला बसला असून मध्य रेल्वे मार्गावरील राज्यांतर्गत प्रवासी संख्या कमी झाली आहे. कमी प्रतिसादामुळे, प्रवासी संख्या अत्यल्प असल्याने मध्य रेल्वेने अनेक गाड्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये मुंबईहून मनमाड, पुणे, नागपूर, लातूर, सोलापूर, कोल्हापूर, अमरावती, जालना याठिकाणी जाणाऱ्या 10, 11 मेपर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत.

या गाड्या झाल्या रद्द

  1. रेल्वे क्र. 02109/02110 मुंबई -मनमाड-मुंबई विशेष एक्सप्रेस 27 एप्रिल ते 10 मे 2021 पर्यंत रद्द केली आहे.
  2. रेल्वे क्र. 02015/02016 मुंबई - पुणे- मुंबई विशेष एक्सप्रेस 27 एप्रिल ते 10 मे 2021 पर्यंत रद्द केली आहे.
  3. रेल्वे क्र. 02113 पुणे-नागपूर त्रि-साप्ताहिक विशेष एक्सप्रेस 28 एप्रिल ते 10 मे 2021 पर्यंत व ट्रेन क्रमांक 02114 नागपूर-पुणे त्रि-साप्ताहिक विशेष एक्सप्रेस 27एप्रिल ते 9 मे 2021 पर्यंत रद्द करण्यात आलेली आहे.
  4. रेल्वे क्र. 02189 मुंबई-नागपूर विशेष एक्स्प्रेस 28 एप्रिल ते 11 मे 2021 आणि 02190 नागपूर- मुंबई विशेष 27 एप्रिल ते 10 मे 2021 पर्यंत रद्द असणार आहेत.
  5. रेल्वे क्र. 02207 मुंबई-लातूर विशेष एक्स्प्रेस आठवड्यातील चार दिवस 27 एप्रिल ते 10 मे 2021 पर्यंत आणि 02208 लातूर-मुंबई आठवड्यातील चार दिवस विशेष 28 एप्रिल ते 11 मे 2021 पर्यंत रद्द असणार आहेत.
  6. रेल्वे क्र. 02115 मुंबई - सोलापूर विशेष एक्स्प्रेस 28 एप्रिल ते 11 मे 2021 पर्यंत आणि 02116 सोलापूर-मुंबई विशेष एक्स्प्रेस 27 एप्रिल ते 10 मे 2021 पर्यंत रद्द असणार आहेत.
  7. रेल्वे क्र. 01411 मुंबई- कोल्हापूर विशेष एक्सप्रेस 28 एप्रिल ते 11 मे 2021 पर्यंत आणि 01412 कोल्हापूर-मुंबई विशेष एक्सप्रेस 27 एप्रिल ते 10 मे 2021 पर्यंत रद्द असणार आहेत.
  8. रेल्वे क्र. 02111 मुंबई-अमरावती विशेष एक्सप्रेस 28 एप्रिल ते 11 मे 2021 पर्यंत आणि 02112 अमरावती-मुंबई विशेष एक्सप्रेस 27 एप्रिल ते 10 मे 2021 पर्यंत रद्द असणार आहेत.
  9. रेल्वे क्र. ट्रेन क्रमांक 02271 मुंबई-जालना विशेष एक्सप्रेस 27 एप्रिल ते 10 मे 2021 पर्यंत आणि 02272 जालना-मुंबई विशेष एक्सप्रेस 28 एप्रिल ते 11 मे 2021 पर्यंत रद्द असणार आहेत.
  10. रेल्वे क्र. 02043 मुंबई-बिदर त्रि-साप्ताहिक विशेष एक्सप्रेस 28 एप्रिल ते 8 मे 2021 पर्यंत आणि 02044 बिदर-मुंबई त्रि-साप्ताहिक विशेष एक्सप्रेस 29 एप्रिल ते 9 मे 2021पर्यंत रद्द असणार आहेत.

हेही वाचा -मुंबईत पावसाचे पाणी साचणार नाही याची दक्षता घ्या, आदित्य ठाकरेंच्या महापालिकेला सूचना

ABOUT THE AUTHOR

...view details