महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

उच्च न्यायालयाकडून रमेश कदमांना उमेदवारी अर्ज भरण्यास तात्पुरता जामीन - महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

सोलापूरमधील मोहोळ मतदार संघातून आमदार रमेश कदम निवडणूक लढविणार आहेत. त्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात जामिनासाठी याचिका दाखल करण्यात आली होती. मुंबई उच्च न्यायालयाने 3 ओक्टॉबर ते 6 ओक्टॉबर या काळात तात्पुरता जामीन रमेश कदम यांना मंजूर केली आहे.

रमेश कदम

By

Published : Oct 1, 2019, 7:30 PM IST

मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेसचे बडतर्फ आमदार रमेश कदम यांना मुंबई उच्च न्यायालयाने विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी 4 दिवसांचा जामीन मंजूर केला आहे. त्यांच्यावर तब्बल 450 कोटी रुपयांच्या महामंडळ घोटाळ्याचा आरोप आहे. सोलापूरमधील मोहोळ मतदार संघातून आमदार रमेश कदम निवडणूक लढविणार आहेत. त्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात जामिनासाठी याचिका दाखल करण्यात आली होती. मात्र, या अगोदरच्या सुनावणीत मुंबई उच्च न्यायालयाने जामीन याचिका फेटाळली होती. केवळ उमेदवारी अर्ज भरण्यासाठी पुन्हा याचिका दाखल केली असता मुंबई उच्च न्यायालयाने 3 ओक्टॉबर ते 6 ओक्टॉबर या काळात तात्पुरता जामीन रमेश कदम यांना मंजूर केली आहे.

हेही वाचा-विधानसभा निवडणूक 2019 : चार ऑक्टोबरला मुख्यमंत्री भरणार उमेदवारी अर्ज

दरम्यान, राष्ट्रवादीचे आमदार रमेश कदम हे महामंडळाच्या अध्यक्ष पदावर असताना तब्बल साडेचारशे कोटीहून अधिक रुपयांचा घोटाळा केल्याप्रकरणी सीआयडीकडून चौकशी करण्यात येत होती. या प्रकरणी बोगस लाभार्थी दाखवून कोट्यावधी रुपयांचा घोटाळ्या प्रकरणी आमदार रमेश कदम यांच्यासह 12 जणांना अटक झाली आहे. याप्रकरणी आमदार रमेश कदम यांच्या विरोधात सीआयडीने दोन हजार पानांचे आरोपपत्र दाखल केले होते. सध्या रमेश कदम हे आर्थर रोड तुरुंगात आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details