मुंबई- 'मिशन बिगीन अगेन'च्या पहिल्या टप्प्यात केंद्र सरकारने देशातील मंदिरे आणि इतर प्रार्थनास्थळे खुली करण्याचा निर्णय घेतला. त्या निर्णयानुसार देशातील अनेक प्रार्थनास्थळे आजपासून भाविकांसाठी खुली करण्यात आली आहे.
देशभरात प्रार्थनास्थळे आजपासून भाविकांसाठी खुली; मुंबईत देऊळबंदी कायम - महाराष्ट्र कोरोना अपडेट लाईव्ह
केंद्र सरकारच्या निर्णयानुसार राज्यातील मंदिरे आणि प्रार्थनास्थळे भाविकांसाठी खुली करण्यात आली आहे. मात्र, मुंबईत कोरोनाबाधितांची वाढती संख्या पाहता मंदिरे बंदच ठेवण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
देशभरात प्रार्थनास्थळे आजपासून भाविकांसाठी खुली; मुंबईत देऊळबंदी कायम
महाराष्ट्रात आणि विशेषतः मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव बघता प्रार्थनास्थळे बंदच ठेवण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानुसार शहरातील मंदिरे आज भाविकांसाठी उघडली गेली नाही. आज संकष्टी चतुर्थी असूनही मुंबईच्या प्रभादेवी येथील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिर बंद ठेवण्यात आले आहे. या मंदिर परिसराचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी केदार शिंत्रे यांनी..
Last Updated : Jun 8, 2020, 6:39 PM IST